''आंदुर्ले महोत्सवा''त कलाविष्कारांनी रंगत

''आंदुर्ले महोत्सवा''त कलाविष्कारांनी रंगत

Published on

swt286.jpg
00973
आंदुर्ले ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित कला महोत्सवात नृत्याविष्काराने रंगत आणली. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘आंदुर्ले महोत्सवा’त कलाविष्कारांनी रंगत
विजेत्यांचा सन्मान ः विविध स्पर्धांसह स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः आंदुर्ले महोत्सवात नृत्याविष्कार, विविध स्पर्धांमुळे रंगत आली. या महोत्सवात मांडण्यात आलेल्या विविध स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आंदुर्ले आयोजित दोन दिवसीय ''कला महोत्सव २०२५'' मोठ्या उत्साहात व जल्लोषात ग्रामदेवता श्री देवी आंदुर्लाई मंदिर येथे पार पडला. कला महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व क्रमांक मिळविणारे विजेते असे - पर्यावरण पूरक आकाशकंदील स्पर्धा-अक्षय मांजरेकर, अनुज रेवंडकर, महादेव दाभोलकर. उत्तेजनार्थ सदाशिव तेंडोलकर. जुन्या साड्यांपासून कापडी पिशवी बनविणे-प्रथम अंजली परब, द्वितीय रसिका मांजरेकर, वैद्यही मोर्ये, तृतीय गीता वेंगुर्लेकर. टाकाऊ वस्तूंपासून हस्तकला स्पर्धा ः खुला गट-जयवंत परब, देवेंद्र धुरी, वैद्यही मोर्ये. शालेय गट-साक्षी राऊळ, आरती धुरी, रंजना प्रभू. शालेय गट- प्रथम वर्षा मेस्त्री, द्वितीय योगेश्वरी, दुर्वा, कीर्ती वेंगुर्लेकर, तृतीय आर्या, मुग्धा पाटील. सुदृढ वासरू स्पर्धा-यशवंत परब, मदन परब, ज्ञानेश्वर येरम. उत्तेजनार्थ-कमलेश राऊळ, दिलीप वेंगुर्लेकर. सुदृढ बालक स्पर्धा ः पहिला गट-तेजस राऊळ, वियांश परुळेकर, कियांश कोंडसकर. उत्तेजनार्थ-निहित चव्हाण. दुसरा गट-उर्वी तेंडोलकर, कार्तिकेय तांडेल, युवांश मोर्ये. उत्तेजनार्थ आर्वी सावंत.
महीलांची पाककला स्पर्धा-सुचिता साळगावकर, गायत्री तेंडोलकर, नम्रता कोंडसकर. पुरुषांची पाककला स्पर्धा-नारायण कोंडसकर, संतोष तेंडोलकर, अजित होडावडेकर, दीपक परब. उत्तेजनार्थ-दीपक नागोळकर, रुपेश वालावलकर. वेशभूषा स्पर्धा ः पहिला गट-निशिका परब, हर्षाली मेस्त्री, किरण परब. दुसरा गट-जीविका आंदुर्लेकर, गोविंद राऊळ, श्रावी निवतकर. विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com