चिपळूण ः कापसाळपर्यंत उड्डाणपूल वाढवण्याची मागणी रखडली
rat28p3.jpg -
00922
चिपळूण : शिवाजीनगर भागात उड्डाणपुलाच्या पिअरकॅपवर गर्डर चढवण्याचे काम सुरू आहे.
कापसाळपर्यंत उड्डाणपूल वाढवण्याची मागणी रखडली
मुंबई - गोवा महामार्ग; विविध राजकीय पक्षांकडून पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाग पॉवरहाऊस येथील चौकातून ये-जा करताना कसरत करावी लागत असल्यामुळे सध्या बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलांची लांबी कापसाळपर्यंत वाढवा, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यासाठी चिपळूण शहरातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाच्या वाढीव बांधकामासाठी एकत्र लढा देण्याचे ठरवले होते. त्यानंतर वाढीव बांधकामाचा विषय मागे पडला आहे.
पाग पॉवरहाऊस येथे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. सततच्या घटनांमुळे हा चौक भविष्यात ब्लॅकस्पॉट म्हणून ओळखला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यासाठी उड्डाणपूल कापसाळपर्यंत नेण्याची मागणी केली होती. त्यापूर्वी उड्डाणपूल कापसाळपर्यंत मंजूर करण्यात आला होता; मात्र शहरातील काही नागरिकांनी शहराचे महत्त्व कमी होईल, या भितीने तो प्रांत कार्यालयापर्यंतच मंजूर करवून घेतला. सद्यःस्थितीत मंजूर उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. हा पूल जानेवारी २०२६ मध्ये वाहतुकीसाठी खुला होईल, असा अंदाज आहे. आतापर्यंत ७३.५० टक्के काम पूर्णही झालेले आहे. उर्वरित काम अवघड असले तरीही जानेवारीपर्यंत पूलाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. महामार्गावर पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. चिपळुणमधील वाहतुकीच्या सोयीसाठी बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.
चौकट
अजून पाच महिने लागणार
बहादूरशेख नाका येथून या पुलाचे काम सप्टेंबर २०२० मध्ये सुरू झाले; मात्र १६ ऑक्टोबर २०२३ रोजी पुलाचा काही भाग कोसळल्याने नवीन रचनेनुसार काम सुरू करण्यात आले. बहुतांशी पिअरकॅपचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत. आता एकाचवेळी पिअरकॅपवर गर्डर चढवणे व काही ठिकाणी स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी दोन क्रेन कार्यरत असून, त्या आधारे ७२८ पैकी २२२ गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. दररोज चार ते सहा गर्डर चढवण्यात येत आहेत. त्यामुळे उर्वरित कामासाठी अजून पाच महिन्यांचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे.
कोट
उड्डाणपुलाच्या वाढीव कामासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्रित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत. तत्पूर्वी सर्व पदाधिकारी एकत्र बसून कोणकोणत्या मागण्या केल्या पाहिजेत याचे नियोजन करू आणि त्यानंतर त्या गडकरी यांच्यासमोर मांडू.
- शशिकांत मोदी, मंडळ अध्यक्ष भाजप, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

