स्वतंत्र खात्यामुळे सहकाराला बळकटी
01003
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ग्रामीण, नागरी बिगरशेती सेवक सहकारी पतसंस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.
स्वतंत्र खात्यामुळे सहकाराला बळकटी
जिल्हाधिकारी धोडमिसे ः सिंधुदुर्गनगरीत पतसंस्थांसाठी प्रशिक्षण वर्ग
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ ः केंद्राने स्वतंत्र सहकार खाते निर्माण केल्याने सहकाराला बळकटी मिळाली आहे. मोठ्या संख्येने नव्याने सहकारी संस्था स्थापन होत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विभागातर्फे आयोजित जिल्ह्यातील ग्रामीण, नागरी बिगरशेती सेवक सहकारी पतसंस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात या प्रशिक्षण वर्गाचे काल (ता.२७) दिवसभर आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक बाळ परब होते. यावेळी प्रशिक्षण समन्वयक मयुर शेळके, पवन पाटील, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे राज्य समन्वयक धनंजय डोईफोडे, रत्नागिरी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक सोपान शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी सायबर क्राईमच्या नितीन पुरळकर आणि श्री. गावडे यांनी सायबर सिक्युरिटी, लेटेस्ट फ्रॉड्स, डिजिटल अरेस्ट, स्कॅम, क्रिप्टोकरांशी, अँटी मनी लाँडरिंग तरतूद याबाबत पतसंस्थांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे राज्य समन्वयक डोईफोडे यांनी ठेव संकलन, निधी व्यवस्थापन, ग्राहक संबंध आणि ग्राहक केंद्रित सोयीसुविधा, व्यवसायाच्या नवनवीन संधी, संचालक, अधिकारी कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले. रत्नागिरी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक शिंदे यांनी आदर्श उपविधी याबाबत मार्गदर्शन केले. श्री. डोईफोडे यांनी कर्ज वसुलीबाबत तरतुदी आणि प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक बाळ परब, धनंजय डोईफोडे, सोपान शिंदे यांनी उपस्थित संस्था संचालक, पदाधिकारी, अधिकारी यांच्या सोबत प्रश्नोत्तरे दिली.
---------------
मोबाईलचा वापर सुरक्षितपणे करा
सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन करताना नितीन पुरळकर यांनी, सायबर क्राईम मोबाईलच्या माध्यमातून होतो. त्यामुळे मोबाईल सुरक्षित वापरणे काळाची गरज बनली आहे. सायबर गुन्हे आर्थिक फसवणूक आणि बदला घेणे, या हेतूने होत असतात. सायबर क्राईम केल्यास कमीतकमी तीन वर्षे शिक्षा आणि दीड लाख रुपये दंड होतो. त्यामुळे अनोळख्या संकेतस्थळावरून ऑनलाईन खरेदी करू नये. फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबत जागृतीही करा. राजकीय पोस्ट फॉरवर्ड करताना समाजाच्या, जातीच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या. ओटीपी, क्यूआर कोड कोणालाही शेअर करू नका, अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, अशाप्रकारचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

