रॉक गार्डनचा वीज पुरवठा
तातडीने सुरळीत करावा

रॉक गार्डनचा वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा

Published on

01007

रॉक गार्डनचा वीजपुरवठा
तातडीने सुरळीत करावा

पालकमंत्र्यांच्या पालिकेला दखल

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ ः पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र असलेले रॉकगार्डन रात्रीपासून पुन्हा प्रकाशमय होणार आहे. वादळी वातावरणामुळे येथील विद्युत पुरवठा करणारी वायर आणि मीटर जळाल्याने गेल्या काही दिवसांपासून हे गार्डन अंधारात होते. ज्यामुळे रात्रीच्या वेळी भेट देणाऱ्या पर्यटकांची निराशा होत होती. याबाबत मालवण भाजपने पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका प्रशासनास दिले आहेत, अशी माहिती भाजप शहर मंडल तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकातून दिली.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि दरवर्षी दहा लाखांपेक्षा जास्त पर्यटक ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मालवणला भेट देतात. हे पर्यटक आवर्जून रॉक गार्डनलादेखील भेट देतात. मालवण शहरासोबतच वायरी, तारकर्ली, देवबाग, तोंडवळी, आणि आचरा येथील निवास करणारे पर्यटक रात्रीच्या वेळी पाहण्यासाठी एकमेव पर्यटनस्थळ म्हणून या गार्डनला पसंती देतात. त्यामुळे येथे मोठी गर्दी असते. गेल्या काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मालवण भाजपतर्फे हा विषय पालकमंत्री नीतेश राणे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. पालकमंत्र्यांनी तातडीने या विषयावर लक्ष केंद्रित करत मालवण नगरपरिषदेला ही समस्या मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार मालवण नगरपरिषदने कालच नवीन मीटरसाठी लागणारी आवश्यक रक्कम विद्युत विभागास जमा केली आहे. नवीन मीटर बसवणे आणि जळालेली केबल दुरुस्ती करण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे रॉक गार्डन रात्रीपासून पुन्हा प्रकाशमान होईल, असे श्री. मोंडकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com