राजापूर- कोदवलीतील पुर्नवसन वसाहतीत कचर्याचे साम्राज्य
rat29p6.jpg, rat29p7.jpg
01154, 01155
राजापूर ः पुनर्वसन वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर साचलेला कचरा.
कोदवली पुनर्वसन वसाहतीत कचऱ्याचा सडा
साथींच्या प्रादुर्भावाची भीती; कचरा संकलन करणारी घंटागाडी बंद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ः शहराजवळील कोदवली ग्रामपंचायत हद्दीतील पुनर्वसन वसाहतीत ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पुनर्वसन भागात हॉटेलसह अन्य विविध व्यावसायिकांनी व्यवसाय थाटलेले असल्याने या परिसरात नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे हा परिसर डम्पिंग ग्राऊंड झाला आहे. या कचऱ्यामुळे साथींचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पुनर्वसन वसाहत आहे. या ठिकाणी तहसीलदार निवास, गॅसएजन्सी व हॉटेल वॉटर येथील वळणाच्या पुढे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पुनर्वसन वसाहतीमधील कचरा उचलण्यासाठी कोदवली ग्रामपंचायतीकडून घंटागाडीचे नियोजन केले होते. त्या घंटागाडीच्या साह्याने या भागातील कचरा उचलला जात होता; मात्र, गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलणारी घंटागाडी बंद झालेली आहे. भरलोकवस्तीमध्ये साचलेल्या या कचऱ्यामुळे आजार पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या कचऱ्यांच्या साचलेल्या ढिगाऱ्यांबद्दल लोकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावा, अशी मागणीही होत आहे.
चौकट
पाचशेहून अधिक लोकसंख्या
पुनर्वसन वसाहतीमध्ये सुमारे पाचशेहून अधिक लोकसंख्या असून, सुमारे १५० हून अधिक इमारती आहेत. यापैकी काही इमारतींचा लोकनिवासासाठी तर काहीजण व्यापारी वापरासाठी उपयोग करतात. व्यापारी वापरासाठी इमारतींमध्ये हॉटेल, दुकाने आदींचा समावेश आहे. या इमारतींचा कर ग्रामपंचायतीकडून आकारला जात असून, या इमारती कराद्वारे कोदवली ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते.
कोट
पुनर्वसन वसाहत भागामध्ये भरलोकवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचून त्याचे ढीग झाले आहेत. असाच कचरा साठून राहिल्यास त्यातून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साचलेल्या कचर्याची योग्य विल्हेवाट लावताना भविष्यामध्ये कचरा संकलनाबाबत प्रशासनाने योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे.
- राजेश, पुनर्वसन वसाहत रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

