समाजात तरुणांचे योगदान महत्त्वाचे

समाजात तरुणांचे योगदान महत्त्वाचे

Published on

swt302.jpg
01353
देवगडः आमदार नीलेश राणे यांचा अ‍ॅड. सिध्देश माणगावकर यांनी सन्मान केला. बाजूला संजय आग्रे, संदेश सावंत-पटेल आदी. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

समाजात तरुणांचे योगदान महत्त्वाचे
आमदार नीलेश राणेः देवगड येथील राज्यस्तरीय रांगोळी प्रदर्शनाला भेट
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३०ः कोणत्याही कार्यक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असतो. कामामधून तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. राजकारण एकीकडे सुरूच असले तरी तरुण पिढी समाजात काय करते, हे महत्त्वाचे ठरते. येथील युवकांच्या संघटनेबरोबरच काम करायला आवडेल, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे येथे केले. खासदार नारायण राणे यांची राजकीय सुरुवात तरुण वयातच झाली आणि पुढे त्यांच्याबरोबर असलेले विविध पातळीवर लोकप्रतिनिधी झाले, असेही त्यांनी सांगितले.
येथील युथ फोरम या संस्थेच्या वतीने येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रांगोळी प्रदर्शनाला आमदार राणे यांनी भेट देऊन तरुणांच्या उपक्रमाचे कौतुक केले. युथ फोरमचे अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धेश माणगावकर यांनी त्यांचा सन्मान केला. मंचावर श्री. राणे यांच्यासह उपनेते संजय आग्रे, संदेश सावंत-पटेल, तालुकाप्रमुख विलास साळसकर, अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू आदी उपस्थित होते. सुरुवातीला आमदार राणे यांनी रांगोळी प्रदर्शन पाहिले.
आमदार राणे म्हणाले, ‘‘कार्यक्रम छोटा किंवा मोठा, यापेक्षा त्यामध्ये तरुणांचा सहभाग किती, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. राजकारण येत-जात असते, कोण जिंकते तर कोण हरते; मात्र तरुण काय करतात, हे महत्त्वाचे आहे. तरुणांनी समाजाची बांधिलकी जपत काम केले पाहिजे.’’
यावेळी श्री. आग्रे यांनी, कार्यकर्ता कसा जपावा, हे आमदार राणे यांच्याकडून जाणावे. वेळ काढून त्यांनी येथे भेट दिल्याचे सांगितले. प्रास्ताविकात अ‍ॅड. माणगावकर यांनी युथ फोरम संस्थेच्या विविध उपक्रमांची धावती माहिती दिली. आभार ऋत्विक धुरी यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष प्रणव नलावडे, श्रुती माणगावकर, आकाश सकपाळ, ओंकार सारंग, आज्ञा कोयंडे उपस्थित होते.

चौकट
शिवसेना म्हणजे तरुणांची संघटना
तरुणांची संघटना म्हणजे ‘शिवसेना’ असे आमदार राणे यांनी सांगून येथील युवकांच्या कार्यक्रमासाठी आपल्याला केव्हाही साथ घालण्याचे आवाहन केले. यावेळचा दौरा राजकीय नाही, परंतु यासाठी केव्हातरी सभासद अर्ज घेऊन येईन, असेही त्यांनी मिस्किलपणे सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com