मराठवाड्याप्रमाणेच भरपाई मिळण्यासाठी आग्रही
swt306.jpg
01357
नीलेश राणे
मराठवाड्याप्रमाणेच भरपाई मिळण्यासाठी आग्रही
आमदार नीलेश राणे ः सिंधुदुर्गातील नुकसानप्रश्नी भूमिका स्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः मराठवाड्यात अतिवृष्टीनंतर ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत दिली, त्याच ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार कोकणातील शेतकरी, मच्छीमार या नुकसानग्रस्तांना मिळावी, यासाठी मी आग्रही आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांनी दिली.
आमदार राणे म्हणाले, ‘लांबलेल्या पावसामुळे कुडाळ मालवण मतदारसंघातील मालवण तालुक्यात भात, भुईमूग, नाचणी पिकाचे ९५०० एकर जमीन क्षेत्र आहे, तर कुडाळ तालुक्यात १३,५५० एकर जमीन क्षेत्र आहे. येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व पीक सडले असून काही पिकांना कोंब आलेले आहेत. मालवण तालुक्यात ४,५०० एकर आंबा, काजू ८५० एकर क्षेत्र आहे. कुडाळ तालुक्यात आंबा ३३७५, काजू लागवड १२,४९७ एकर जमीन क्षेत्र आहे. या पिकांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. अजून मोहोर आलेला नाही. मोहोर कधी येईल सांगता येणार नाही. मार्चनंतर मोहोर आल्याल आंबा, काजू व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. उशिरा मोहोर आला व मेमध्ये पाऊस आल्यास काही ठिकाणी पीकच येणार नाही, अशीही परिस्थिती शेतकऱ्यांवर उद्भवू शकते. दुसरीकडे मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ३५६१ नोंदणीकृत मासेमारी बोटी आहेत, त्यामध्ये वॉटर स्पोर्ट, किल्ले प्रवासी सर्व्हिस व यावर जे किनारपट्टीवरील लोक अवलंबून आहेत, त्यांचे व मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांचे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वॉटर स्पोर्टस् किल्ला सर्व्हिस व या आधारावर असलेल्या लोकांचे सुमारे १२ ते १३ कोटीपर्यंत नुकसान झाले आहे. त्यामुळे हे एकूण नुकसान सुमारे २५ कोटींचे झालेले आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता जी मदत दिली जाते, ती ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार दिली जाते, असे सांगण्यात आले. मराठवाड्यात अतिवृष्टीनंतर एनडीआरएफच्या निकषानुसार तेथील शेतकऱ्यांना मदत दिली, त्याच निकषानुसार कोकणातील शेतकरी व मच्छीमार या नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी मी आग्रही आहे.’
चौकट
अधिवेशनात लक्ष वेधणार
नुकसान झाल्याबाबत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी अगोदरच पत्र दिले आहे. आता त्यांची भेट घेऊन कोकणात पडणाऱ्या पावसाबाबत तसेच होणाऱ्या नुकसानीबाबत जाणीव करून देऊन देणार आहे. उष्णता व पाऊस यामुळे कोकणात होणाऱ्या नुकसानीबाबत वेगळी विशेष पॉलिसी नेमण्याकरिता मी येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न मांडणार आहे. शेती तसेच इतर झालेल्या नुकसानीचा ४० ते ५० टक्के पंचनामा झाला असून, लवकरच १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील, असे आमदार राणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

