चिपळूण-विद्याभारतीतर्फे सुजाण पालक व सुदृढ बालक स्पर्धा
सुजाण पालक, सुदृढ बालक स्पर्धा
चिपळूणमध्ये १६ ला आयोजन ः आरोग्यासाठी जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत संचालित शिरळ येथील विद्याभारती भारतीय शिक्षासंकुलतर्फे सुजाण पालक व सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ नोव्हेंबरला सकाळी १० ते १ दरम्यान शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माधवबाग सभागृहात होणार आहे. या वर्षीच्या बालदिनाचे औचित्य साधून या चिपळूण तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्याभारती संस्थेची शिरळ येथे गेली १० वर्षे गुरूकुल पद्धतीची शाळा सुरू आहे. मुलांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास हे संस्थेचे ध्येय आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच संगीत, चित्रकला, हस्तकला, मल्लखांब, अॅथलेटिक्स अशा सर्व कला व कौशलयांचे शिक्षण येथे दिले जाते. सध्या लहान मुलांना मोबाईलचे व्यसन जडत आहे. जंकफूडच्या वाढत्या प्रमाणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या विषयी जनजागृती होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. बालक व पालक अशा दोन गटात स्पर्धा आहे. बालकांमध्ये २ गट असून, छोटा गट १ ते ४ वर्षे, मोठा गट ४ ते ८ वर्षे असा आहे. पालकांसाठी एकच गट आहे. यामध्ये पालक आपल्या बालकासह सहभागी होऊ शकतात किंवा स्वतंत्रपणेदेखील सहभाग घेऊ शकतात. प्रत्येक गटासाठी 3 फेऱ्या असतील. डॉक्टर, आहारतज्ञ, सायकॉलॉजिस्ट, शिक्षणतज्ञ व समाजातील मान्यवर असे परीक्षक असतील. यामध्ये मुलांच्या शारीरिक व बौद्धिक क्षमतांचे मूल्यमापन होईल. पालकांचे बौद्धिक, मानसिक व वैचारिक क्षमतांचे मूल्यमापन केले जाईल. प्रत्येक गटातून ३ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, सहभाग आणि विजेते प्रमाणपत्रे मिळणार आहेत. स्पर्धेच्या 3 फेऱ्यांबद्दल अधिक माहिती तसेच प्रवेशिकांसाठी मोहन भिडे यांच्याशी संपर्क साधावा. या अभिनव स्पर्धेत पालकांनी बालकांसह सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

