राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत जैतापूरचा आर्यन विजेता
-rat३०p२२.jpg- 
२५O०१४१३
राजापूर ः राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेतील विजेत्या आर्यन राऊत आणि खेळाडूंसह मान्यवर. 
----
कॅरम स्पर्धेत जैतापूरचा आर्यन विजेता
सकाळ वृत्तसेवा 
राजापूर, ता. ३१ ः आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्टस् अॅकॅडमीतर्फे आयोजित राज्यस्तरीय सुपर लीग अडसूळ ट्रस्ट-कोकण कप शालेय कॅरम स्पर्धेचे विजेतेपद जैतापूर येथील आर्यन राऊत याने पटकावले. आर्यन जैतापूर न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे.
कॅरम स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना ट्रस्टचे सचिव विष्णू तांडेल, युनियनचे कोषाध्यक्ष प्रमोद पार्ट, क्रीडाप्रेमी संजय मांजरेकर, पंच चंद्रकांत करंगुटकर, अर्जुन कालेकर, अविनाश महाडीक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लिलाधर चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सहा टप्प्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यांतील २१८ शालेय खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आर्यन राऊतचा सामना तिसऱ्या टप्प्यातील विजेता प्रसन्न गोळे याच्याशी झाला. डावाच्या सुरुवातीला ८-४ अशी आघाडी घेतलेल्या प्रसन्न गोळेने जोरदार सुरुवात केली होती; मात्र, अचूक नेम, संयम आणि रणनीतीच्या बळावर आर्यनने अंतिम टप्प्यात अप्रतिम पुनरागमन करत १७-१२ च्या फरकाने विजय मिळवला. या शानदार कामगिरीसह आर्यनने साखळीतील सर्वाधिक १० गुण मिळवून स्पर्धेमध्ये अव्वल ठरत विजेतेपद पटकावले. प्रसन्न गोळे आणि पुष्कर गोळे (८ गुण) यांनी स्पर्धेचे संयुक्तपणे उपविजेतेपद तर तनया दळवी (राष्ट्रीय ज्युनियर कॅरमपटू) आणि उमैर पठाण (७ गुण) यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक, तीर्थ ठाकर, शौर्य दिवेकर, ग्रीष्मा धामणकर, शिवांश मोरे, दुर्वेश चव्हाण, विराज बर्वे (६ गुण) संयुक्तपणे चौथा क्रमांक पटकावला. वेदिका पोमेंडकर, रविराज गायकवाड, एन्जेल पटवा, ओम सुरते, आरव आंजर्लेकर, आर्या सोनार, चैतन्य पोमेंडकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

