कणकवली शहर विकासासाठी १० कोटी ६५ लाख
01514
कणकवली शहर विकासासाठी १० कोटी ६५ लाख
नलावडे, हर्णे ः रिंगरोड भूसंपादन, छत्रपतींचा पुतळा सुशोभीकरण आदी कामे होणार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३१ : शहरातील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून १० कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून प्रामुख्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण, रिंगरोड रस्त्यासाठी १ कोटी, तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण आदी कामांचा यात समावेश आहे.
येथील भाजप शहर कार्यालयात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे, बंडू गांगण आदी उपस्थित होते. शहरात मंजूर झालेल्या कामांमध्ये महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत टेंबवाडी (हिंद छात्रालय) ते रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी १२ मीटर डी.पी. रस्त्यासाठी जमिनीचे उर्वरित क्षेत्र संपादन करण्यासाठी १ कोटी, निम्मेवाडी बाईत घर रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, नरडवे रोड मोहन माळ येथील वहाळा शेजारी संरक्षक भिंत बांधण्यासाठी सहा लाख, टेंबवाडी येथील नवीन रस्त्याला सौर पथदीप व्यवस्था, हर्णेआळी हेमंत उपरकर चाळ ते आरोलकर संरक्षक भिंतीपर्यंत गटार बांधकाम, कणकवली नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी सोलार हायमास्ट बसविणे, परबवाडी संतोष पवार घर ते जुन्या नरडवे रस्त्यापर्यंत पदपथ व गटार बांधकाम, एस.टी. वर्कशॉप रस्ता नूतनीकरण, मराठा मंडळ येथे गणेश घाट बांधणे, तांडेल कॉम्प्लेक्स शेजारील गटार बांधकाम, परबवाडी गणपती सानाचे उर्वरित बांधकाम व रस्ता बांधकाम करणे, बाजारपेठ स्मशानभूमी नूतनीकरण, गणपती साना रस्ता कांदळकर घर ते कला महाविद्यालयापर्यंत (दोन्ही बाजूने) गटार बांधकाम, तेलीआळी कस्टम ऑफिस शेजारील गटार बांधकाम, तेलीआळी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण, बाजारपेठ हरिश्चंद्र हॉटेल ते लाड घर गटार बांधकाम, आप्पासाहेब पटवर्धन चौक (आचरा रोड) ते मसुरकर किनई रोडपर्यंत रस्ता नूतनीकरण, महापुरूष मंदिरामागील बाजूचे गटार बांधकाम, कनकनगर येथील सावंत घर ते शिखरे घर गटार बांधकाम, जळकेवाडी स्मशानभूमी येथे संरक्षक भिंत व शेडचे बांधकाम व अन्य अनुषंगिक कामे करणे, कणकवली शहर टेंबवाडी येथे रस्ता गटार बांधकाम, नगरपंचायत सभागृह व परिसर नूतनीकरण, नगरपंचायत हद्दीत बगीचा सुशोभीकरण व पायाभूत सुविधा निर्माण करणे, कणकवली शहर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुतळा व परिसर सुशोभीकरण आदी कामांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

