सुरक्षित जलवाहतुकीचा पर्याय

सुरक्षित जलवाहतुकीचा पर्याय

Published on

बोल बळीराजाचे .......लोगो
(२५ ऑक्टोबर टुडे ३)
कोकणचा समुद्रकिनारा हे कोकणी माणसाच्या उपजीविकेचे साधन आहेच; पण त्याचबरोबर परकीय चलन मिळवून देणारा मासळीचा स्रोत आहे. जैतापूर अणुऊर्जा आणि राजापूर रिफायनरी प्रकल्पाच्या कोटींच्या गप्पा, हिरवा की, लाल यात अडकलेला समर्थनाचा आणि विरोधाचा संघर्ष यामुळे हा किनारा फक्त सुरक्षित वाहतुकीच्या पर्यायापुरताच चर्चिला जातोय, हे दुर्दैव आहे. कोणे एकेकाळी प्रख्यात असलेला आणि आता फक्त प्रस्तावित असलेला सुरक्षित जलवाहतुकीचा पर्याय आपण दुर्लक्षित करतोय. शेकडो वर्षापूर्वी याच मार्गावरून ब्रिटिशांनी हिंदुस्थान आपल्या टाचेखाली आणला. याच किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य गाजवले. मोठमोठी बंदरे आजही कोकणातील वैभवसंपन्न वखारी, जुन्या बाजारपेठा याची साक्ष देतात. तीच आपण खासगी उद्योगांना आंदण देत आहोत.
- rat३१p७.jpg-
P25O01510
- जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
----
सुरक्षित जलवाहतुकीचा पर्याय

खारवी, कोळी, भंडारी समाज आजही दर्यासागरावर विसंबून आहे. आता मोठ्या यांत्रिक नौकांनी छोट्या मच्छीमार बांधवांचे कंबरडेच मोडले आहे. खाडीतील मासेमारी तर इतिहासजमा झाली आहे. कुर्ली, कालवं, मुळे, एकेकाळचे भाजी-कडधान्यांचे पर्याय आता आजोबा-आजीच्या गोष्टीत जमा झालेत म्हणून सामान्य शेतकरी रडत बसणार नाही. कोळंबी, खेकडापालनाचे नियंत्रित पर्याय धडपडत उभे राहात आहेत. समुद्री शेवाळाचा नियंत्रित उद्योग, शेती हा एक कष्टाचा; पण आत्मनिर्भर होण्याचा नवीन मार्ग आहे. गोळप येथील श्री दत्तगुरू स्वयंसहाय्यता गटाने यात दिशादर्शक काम केले आहे.
कप्पाफायकस नावाचे समुद्री शेवाळ कोकणातील उथळ समुद्रकिनारी छान वाढते. कोकणातील उष्ण-दमट हवामान त्यास पूरक आहे. आपले किनारे तसे अजूनही अतिप्रदुषणापासून दूर आहेत. यातील काही किनाऱ्यावर हे शेवाळ वाढवणे, हा शेतीचाच एक अपारंपरिक शेतीप्रकार बाळसं धरत आहे. औषध आणि सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात याला चांगली मागणी आहे. बोटावर मोजण्याइतकेच प्रकल्प या शेवाळनिर्मितीत कोकणात काम करत आहेत. त्यामुळे वृद्धीला खूप वाव आहे. मुख्य अडचण आहे बीज मिळण्याची..यांना लागणारे बीजही इतर दाक्षिणात्य राज्यातून आणावे लागते. वाहतुकीच्या सोईअभावी अर्धेअधिक खराब होते. तसे पाहिले तर महिला, पुरुष दोघांनाही या शेतीप्रकारात कामाची संधी आहे. शासकीय योजना दिव्याखाली अंधार प्रकारातल्या..! बांबूच्या तराफ्यांना दोऱ्या बांधून त्या दोऱ्यांना हे शेवाळ अडकवले जाते नंतर हे तराफे उथळ पाण्यावर अॅंकरच्या सहाय्याने स्थिर केले जातात. कोकणात इतर ठिकाणापेक्षा ते झपाट्याने वाढते; पण त्याच्या देखभालीसाठी छोट्या होड्या गरजेच्या आहेत; पण त्या शासकीय योजनांच्या निकषात बसत नाहीत आणि तात्पुरत्या भाड्यावर घेऊन परवडत नाहीत. यासाठी प्रशिक्षण किंवा प्रात्यक्षिकावर आधारित अभ्यासक्रम तयार करून मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. बेकारीबाबत गप्पा खूप झाल्या. स्थलांतर चिंता वाढवणारे आहे. खूप जिद्दीने, नेटाने, काहीतरी नवीन करण्याच्या विजिगिषुवृत्तीने माझा बळीराजा झटत आहे. दुःख हे की, या सगळ्यातून तयार झालेल्या शेवाळाची गत आंब्यासारखीच होते. घेणारा देईल तो दर..कारण, यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कोकणात नाही.. प्राथमिक प्रकिया जरी इथेच झाली तरी वाहतुकीतला नास वाचेल. माझ्या बळीराजाला दोन पैसे जास्त मिळतील. समुद्री शेवाळ हा नैसर्गिक अखंड उत्पादन होणारा शेतीचाच प्रकार मानून शेतीसंबंधित योजनांचं पाठबळ मिळालं तर असे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे राहतील. फायनल प्रॉडक्ट्सचे व्यवसाय त्यातूनच निर्माण होतील.
दूरदृष्टीच्या पंतप्रधानांनी यासाठी पाठबळ उभे केले आहे. गरज आहे माझ्या बळीराजाने नवीन पर्याय स्वीकारायची..गरज आहे शासकीय व्यवस्थेने धडपडणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी न राहता बरोबर येण्याची. खरंतर, असा नवीन प्रकार स्वीकारायला माझा बळीराजा घाबरतो ते पूर्वानुभवाच्या वाईट बाजूमुळे..बदलता निसर्ग आता बळीराजाला धीट बनण्यावाचून तरणोपाय नाही, हे बजावत आहे.. अपयशाला माझा बळीराजा कधीच घाबरत नव्हता..गरज आहे ती त्याच्या प्रयत्नांना साथ देण्याची!

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com