राजापूर-साखरीनाटे बंदरात शांतता आणि चिंता

राजापूर-साखरीनाटे बंदरात शांतता आणि चिंता

Published on

rat३१p१२.jpg-
०१५२५
राजापूरः प्रतिकूल स्थितीमुळे साखरीनाटे बंदरामध्ये उभ्या असलेल्या होड्या.
-----------
साखरीनाटे बंदरातील मच्छिमार चिंतेत
वादळी हवामानाने कोंडी ; मासेमारी ठप्प, वीस लाखांचा फटका, अन्य उद्योगांनाही झळ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ः सागरी किनारपट्टीवरील प्रतिकूल स्थिती आणि कमी मिळणाऱ्या मासळीमुळे मच्छीमांरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामध्ये आता गेल्या आठवडाभरापासून घोंगावत असलेल्या मोंथा वादळाची भर पडली आहे. या वादळातून निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीमुळे साखरीनाटे बंदरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून मच्छीमारांनी मासेमारी थांबवली आहे. त्यामुळे साखरीनाटे बंदरामध्ये नेहमी दिसणारी लगबग थांबली आहे. मासेमारी बंद असल्याने सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाले असून, मासेमारीवर आधारित व्यावसायिकांचीही आर्थिक कोंडी झाली आहे.
तालुक्याच्या किनारपट्टीवर साखरीनाटे बंदर असून, दरदिवशी मच्छीमारीमधून लाखो रुपयांची उलाढाल होते. या ठिकाणी सुमारे ७०-७५ पर्सिनेट, दीडशे ते दोनशे फिशिंग ट्रॉलर, शंभर यांत्रिक होड्या, सुमारे पन्नास बिगरयांत्रिक होड्या असे मिळून साडेतीनशे-पावणेचारशे मच्छीमार नौका मच्छीमारी करतात. त्यातून मच्छीमार व्यवसायातून वर्षाला सुमारे शंभर कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल या बंदरामध्ये होते. विविध वादळे, अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीला मच्छीमारांना सामारे जावे लागत असून, कमी प्रमाणात मिळणाऱ्या मासळीमुळे आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे. पावसानेही धुमाकूळ घातला असूनही ‘मोंथा’ वादळाचा परिणाम जाणवत आहे.
मुसळधार पावसाच्या जोडीला खवळलेला समुद्र, अजस्र लाटा आणि वारा यामुळे मासेमारासाठी प्रतिकूल वातावरण आहे. मोंथा वादळाच्या परिणामामुळे हवामानखात्याने मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून साखरीनाटे बंदरातील मासेमारी ठप्प आहे. पावसाचा जोरही कायम असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मच्छीमारीवर अवलंबून असलेला वाहतूक व्यवसाय, बर्फाच्या फॅक्टरी, छोटे मासेविक्रेते यांचाही व्यवसाय ठप्प झाला असून, साऱ्यांचीच आर्थिक कोंडी झाली आहे.

कोट
मोंथा वादळामुळे समुद्रामध्ये प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून मासेमारी आणि त्यावर अवलंबून असलेले छोटे-मोठे विविध व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. प्रतिकूल स्थिती संपुष्टात येण्याची प्रतीक्षा आहे. ठप्प झालेल्या मासेमारीमुळे लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
- अमजद बोरकर, मच्छीमार नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com