मसाला पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत

मसाला पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत

Published on

- rat३१p१९.jpg-
२५O०१५६०
रत्नागिरी ः पोमेंडी येथील कृषी विभागाच्या जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिकेतील रोपांची पाहणी करताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल.
----
मसालापिकांचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत
जिल्हाधिकारी मनुज जिंदल ः जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिकेची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या जोडीनेच दालचिनी, मिरी, लवंग अशा मसालापिकांचे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी व्यक्त केली.
पोमेंडी येथील कृषी विभागाच्या जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिका तथा कृषी चिकित्सालयाला जिल्हाधिकारी जिंदल यांनी गुरूवारी (ता. ३०) भेट दिली. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, प्रांताधिकारी जीवन देसाई, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, गुणनियंत्रक अधिकारी राजेंद्र कुंभार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जिंदल यांनी काजू, आंबा, दालचिनी, नारळ, सुपारी आदींच्या रोपांची पाहणी करून माहिती घेतली. ते म्हणाले, केरळच्या धर्तीवर आपल्या जिल्ह्यामध्ये मसाल्यांच्या पदार्थांची शेती वाढवायला हरकत नाही. केरळइतकेच किंबहुना त्याहूनही अधिक चांगले वातावरण आपल्या जिल्ह्यात कोकणपट्ट्यात आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. हे क्षेत्र अधिक वाढेल याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे सांगितले.
गुणनियंत्रक निरीक्षक कुंभार यांनी फळरोपवाटिकेविषयी सविस्तर माहिती दिली. पोमेंडीतील जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिका १२.८१ हेक्टर क्षेत्रावर आहे. त्यात नारळ मातृवृक्ष संख्या १००० असून, बाणावली, ग्रीनडॉर्फ, ऑरेंज डॉर्फ, यलो डॉर्फ, कोकण भाट्ये, टीडी, डीटी, केरा संकर आदी जातींचे नारळ मातृवृक्ष आहेत. त्यापासून रोपेनिर्मिती केली जातात तसेच उपलब्ध शिल्लक बियाणे महाराष्ट्रातील इतर शासकीय रोपवाटिकांना नारळरोपे निर्मितीसाठी पुरवठा केले जाते. हापूस, पायरी, रत्ना, सिंधू, गोवा मानकुर, जॉर्ज, नीलम, केंट, सुवर्णरेखा, दूध पेढा या जातीचे २५० मातृवृक्ष आहेत. या सर्व जातीची आंबाकलमे रोपवाटिका प्रक्षेत्रावर उपलब्ध आहेत. काजूकलमे मातृवृक्षाची संख्या ६०० असून, त्यामध्ये समाविष्ट जात वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ७, वेंगुर्ला ८ या जातींचा समावेश आहे.
----
८० लाखांचा महसूल
फळरोपवाटिकेवरील मातृवृक्षांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी ५० लाख लिटर क्षमतेचे प्लास्टिक आच्छादनाचे शेततळेसुद्धा आहे. सध्या रोपवाटिकेवर सर्व प्रकारची नारळरोपे, आंबा कलमे, चिकू कलमे, काजू कलमे, दालचिनी, सुपारी रोपे उपलब्ध आहेत. ही रोपवाटिका राज्यात प्रथम क्रमांकाची असून, या रोपवाटिकेपासून दरवर्षी ८० लाख रुपये इतका महसूल कलमे रोपे विक्रीतून जमा होते, असे कुंभार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com