''एकता दौड''ला आचऱ्यात प्रतिसाद

''एकता दौड''ला आचऱ्यात प्रतिसाद

Published on

swt317.jpg
01572
आचराः येथे एकता दौडमध्ये सहभागी मान्यवर.

‘एकता दौड’ला आचऱ्यात प्रतिसाद
आचरा, ता. ३१ः सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातर्फे, आचरा पोलिस ठाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आचरा ग्रामपंचायत ते आचरा बीच अशी भव्य ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित केली होती. याची सुरुवात आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी आचरा उपसरपंच संतोष मिराशी, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, ग्रामपंचायत सदस्या किशोरी आचरेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास टेंबूलकर, मीनाक्षी देसाई, पोलिस कर्मचारी मिलिंद परब, अमित हळदणकर, सौ. परब, स्वाती आचरेकर, पोलिस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी, सीताराम सकपाळ, दिनेश पाताडे, अमोल पेडणेकर आदी उपस्थित होते.
-------------
swt318.jpg

सातोसे ः येथील देवी माऊली पंचायतन देवस्थान.

सातोसेत उद्यापासून हरिनाम सप्ताह
बांदा, ता. ३१ : सातोसे येथील देवी माऊली पंचायतन देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाला रविवारी (ता.२) दुपारी १२ पासून सुरुवात होणार आहे. यानिमित्त गावातील भजन मंडळांचे अखंडित भजन होणार आहे. त्याच रात्री १२ वाजता दिंडी होणार आहे. सोमवारी (ता. ३) दुपारी १२ च्या दरम्यान हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर पावणी, कौल व प्रसाद होणार आहे. सायंकाळी ६ वाजता तरंगकाठी देवतांचा कवळास सोहळा होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवी माऊली स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमिती, मानकरी व ग्रामस्थांतर्फे केले आहे.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com