संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

रत्नागिरी ३, ४ ला
गौरव गाथा संविधानाची
रत्नागिरी ः भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री १० वा. ‘गौरवगाथा संविधानाची’ व ४ ला सायं. ६.३० ते रात्री १० वा. ‘जागर संविधानाचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे आदी उपस्थित राहणार आहेत.


भिंगळोली ते शिरगाव
एकता वॉकिंग परेड
मंडणगड ः देशाचे माजी गृहमंत्री व लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त मंडणगड पोलिस ठाण्याच्यावतीने भिंगळोली ते शिरगावदरम्यान वॉकिंग परेड आयोजित करण्यात आली. या परेडचे नेतृत्व पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांनी केले. परेडमध्ये मंडणगड पोलिस ठाण्याचे अंमलदार, पोलिस पाटील, पंचायत समिती सदस्य, महसूल विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. परेडदरम्यान नागरिकांना राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला तसेच सहभागी सर्वांनी राष्ट्रीय एकता शपथ घेत देशाच्या अखंडतेसाठी व सलोख्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

मुंडे महाविद्यालयात
राष्ट्रीय एकता दिवस
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक विभाग आणि एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दगडू जगताप उपस्थित होते. या प्रसंगी प्रा. प्राची कदम, रोशन पिचुर्ले, सोनाली मर्चंडे, सचिन थोरे, अरूण घोडेराव, दीपक पवार, प्रमोद सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

चिपळुणात
एकता दौड
चिपळूण ः भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज पोलिसांच्यावतीने रन फॉर युनिटी या नावाने एकता दौड आयोजित करण्यात आली होती. या दौडमध्ये पोलिस, शासकीय कर्मचारी आणि शहरातील नागरिक सहभागी झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्या उपस्थितीत या एकता दौडला सुरुवात झाली. या निमित्त चिपळूण पोलिस ठाण्यात सकाळी सात ते साडेआठ या कालावधीत पाच किलोमीटर एकता दौड काढण्यात आली. यामध्ये चिपळूण पोलिस ठाण्याचे ४ पोलिस अधिकारी, ३० अंमलदार, ३० आरसीपीचे जवान, १२ होमगार्ड, १२ पोलिस पाटील, चिपळूण पालिकेचे ३० कर्मचारी, डीबीजी कॉलेजचे ३० विद्यार्थी, गुरुकुल कॉलेजचे २० विद्यार्थी व महिला सायकलिंग असोसिएशनचे १२ महिला एकता दौडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com