सात जिल्ह्यांमध्ये होणार सागरी मासेमारी गणना
सात जिल्ह्यांमध्ये होणार 
सागरी मासेमारी गणना 
रत्नागिरी, ता. ३१ : देशातील सागरी मत्स्य व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून ‘५वी राष्ट्रीय सागरी मासेमारी गणना २०२५’ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ही गणना ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या महाराष्ट्रातील ७ सागरी जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. येथे सागरी मत्स्य व्यवसायाशी संबंधित घरांची, नौकांची आणि सुविधांची तपशीलवार माहिती संकलित केली जाणार आहे. देशातील सर्व किनारपट्टी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गणना होणार आहे. 
राष्ट्रीय सागरी मासेमारी गणना या उपक्रमाची अंमलबजावणी मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्यावतीने करण्यात येत आहे. आयसीएआर-केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (सीएमएफआरआय) ही प्रमुख संस्था म्हणून कार्यरत आहे. या गणनेत फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया (एफएसआय) या संस्थेचे सहकार्य घेतले गेले आहे. येथील मत्स्य विभागाने ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय सागरी मत्स्यिकी संशोधन संस्थेच्या (ICAR-CMFRI) केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था आणि राज्य सरकारांच्या संयुक्त विद्यमाने ही पाचवी सागरी मत्स्य जनगणना २०२५ ची महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. ही जनगणना केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरती मर्यादित नसून, सागरी मात्स्यिकी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशी सखोल माहिती जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे. 
या जनगणनेचा मुख्य उद्देश अचूक आणि तत्काळ माहिती संकलित करणे आहे. यात सुमारे १२ लाख मत्स्य व्यावसायिक कुटुंबे, ५६८ मत्स्यगावे आणि १७३ मत्स्य उतरणी केंद्रे यांचा समावेश आहे. या माहितीच्या आधारे सागरी मात्स्यिकी क्षेत्राच्या विकास नियोजनासाठी तसेच सागरी मच्छीमार, मासेमारी गावे आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल व्यापक माहिती गोळा करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

