सागरी मत्स्य जनगणेस
३ नोव्हेंबरपासून प्रारंभ

सागरी मत्स्य जनगणेस ३ नोव्हेंबरपासून प्रारंभ

Published on

सागरी मत्स्य जनगणेस
३ नोव्हेंबरपासून प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३१ ः मत्स्यव्यवसाय विभागाने भारतीय कृषि संशोधन परिषद केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था (ICAR-CMFRI) आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पाचवी सागरी मत्स्य जनगणना ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान करण्याचे निश्चित केले आहे. ही माहिती मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांनी आज दिली.
श्री. कुवेसकर म्हणाले, "या सागरी मात्स्यिकी जनगणनेचे उद्दिष्ट, केवळ आकडेवारी पुरते मर्यादित नाही तर सुमारे १२ लाख मत्स्यव्यवसायिक कुटुंबे, ५६८ मत्स्य गावे आणि १७३ मत्स्य उतरण केंद्रांबद्दल अचूक आणि तात्काळ माहिती संकलित करणे तसेच सागरी मात्स्यिकी क्षेत्राच्या विकास नियोजनासाठी उपयुक्त असणारी माहिती आणि सागरी मच्छिमार, मासेमारी गावे आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल व्यापक माहिती गोळा करणे हा आहे. यात प्रथमच आर्थिक स्थिती, विविध उपजीविका आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती एका अत्याधुनिक ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गोळा केली जात आहे. याचा शुभारंभ ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ या काळात होत आहे. याकरीता केंद्रीय समुद्री मत्स्य अनुसंधान संस्थान, कोचीने तयार केलेल्या व्यास नाव या अॅपसह टॅबलेट पी.सी. वितरित केले जात आहेत. ज्याद्वारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण व समावेशन केले जाईल आणि जनगणना चौकटीची अचूकता सुनिश्चित केली जाईल."

कोट
भारत सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी आणि व्यापक मोहिम आहे. यामधून मिळणारे निष्कर्ष धोरणनिर्मितीस मार्गदर्शन करणार आहेत. या माहितीच्या माध्यमातून शासकीय योजना तयार करण्यास मदत होणार आहे. मत्स्य समुदायांच्या उपजीविकेचे बळकटीकरण करत, भारताच्या विकास कथेला नवी गती देण्यास यामुळे मदत होणार आहे.
- सागर कुवेसकर, मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com