आयुष्यमान केंद्र ग्रामस्थांना आरोग्यदायी ठरणार
rat१p३.jpg-
२५O०१७३७
पावस - येथील आयुष्यमान आरोग्यकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री उदय सामंत, शेजारी मान्यवर.
---
पावस परिसरात आरोग्यसेवेचा नवा प्रकाश
मंत्री उदय सामंत ः आयुष्यमान आरोग्यकेंद्राचे लोकार्पण, ग्रामीण भागात उपचार सुविधा
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १ : परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्याचा लाभ प्रत्येकाला मिळावा, या दृष्टिकोनातून आयुष्यमान आरोग्यकेंद्र पावसमध्ये उभारण्यात आले. उर्वरित इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यामुळे हे आरोग्यकेंद्र पावस परिसरातील ग्रामस्थांना आरोग्यदायी ठरणार आहे, असे मत उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. पावस आयुष्यमान आरोग्यकेंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे, डॉ. अतुल पाटील, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे तसेच पावस ग्रामपंचायत सरपंच चेतना सामंत, उपसरपंच प्रवीण शिंदे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, बिपिन बंदरकर, तुषार साळवी, नेताजी पाटील, गोळप सरपंच कीर, उपसरपंच संदीप तोडणकर, नाखरे सरपंच विजय चव्हाण, डॉ. प्रवीण शेवाळे आदी उपस्थित होते तसेच पावस पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले, पावस आयुष्यमान आरोग्यकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. दीड कोटीच्या आयुष्यमान आरोग्यकेंद्राचे लोकार्पण झाले. त्यामध्ये आणखीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने मी विशेष प्रयत्न करणार आहे जेणेकरून शहराच्या ठिकाणचा आरोग्याचा ताण कमी होईल. यासाठी आयुष्यमान केंद्राकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. येथील सुविधांचा लाभ घेताना प्रत्येक नागरिकांनी आरोग्य चांगले ठेवण्याच्यादृष्टीने प्रयत्न आहेत. कमीत कमीवेळा या आरोग्यकेंद्राचा लाभ घ्यावा जेणेकरून आपले सर्वांचे आरोग्य चांगले राहावे.
---
चौकट
११ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन
पावस परिसरातील गौतमी नदीवरील पुलाच्या नवीन बांधकामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या कामाचा प्रारंभदेखील काल गौतमीकिनारी करण्यात आला तसेच पावस बाजारपेठमार्गे गोळप या रस्त्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. या समस्येवर उपाय म्हणून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्या कामाचा प्रारंभ पावस चौकात करण्यात आला. अशा प्रकारे पावसमध्ये ११ कोटींच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

