खड्डेमय रस्ता, अपघातांचा धोका

खड्डेमय रस्ता, अपघातांचा धोका

Published on

01741

खड्डेमय रस्ता, अपघातांचा धोका

बांद्यात बॉक्सवेल कामामुळे हाल; दिशादर्शक फलक नसल्याने संताप

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे सुरू असलेल्या बॉक्सवेल पुलाच्या कामामुळे प्रवाशांचे आणि स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. कंत्राटदार आणि महामार्ग विभागाच्या पूर्णपणे नियोजनशून्य कारभाराचा फटका वाहनधारकांना बसत असून, रस्ता खड्डेमय झाला आहे. विशेष म्हणजे, महामार्ग विभागाने कोणतेही फलक न लावता अचानक वाहतूक वळविल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना घडत आहेत, असा गंभीर आरोप स्थानिक करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे बॉक्सवेलचे काम सुरू असताना कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. कामाच्या ठिकाणी महामार्गाचा मोठा भाग पूर्णपणे उखडलेला आहे आणि पावसामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अरुंद आणि दलदलीच्या रस्त्यामुळे अवजड वाहनांना पुढे सरकणेही कठीण झाले आहे. त्यामुळे दररोज या ठिकाणी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. कोणतेही दिशादर्शक फलक, काम सुरू असल्याबद्दलची माहिती देणारे फलक अथवा वेगमर्यादेचे फलक न लावता अचानक वाहतूक वळविण्यात येत आहे. परिणामी वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. दुचाकीस्वार आणि लहान गाड्यांच्या चालकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
---
महामार्ग विभागाने लक्ष द्यावे!
​स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने सूचनाफलक आणि दिशादर्शक फलक लावावेत आणि कंत्राटदाराला व्यवस्थित नियोजन करून काम पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल व संभाव्य अपघात टळतील, असे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com