पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारीपदी पाटणकर
01744
पतंजली योग समितीच्या
जिल्हा प्रभारीपदी पाटणकर
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १ ः रामदेव महाराज यांच्या आशिर्वादाने पतंजली भारत स्वाभिमान न्यास महाराष्ट्र पश्चिमचे राज्य प्रभारी बापूजी पाडळकर व पतंजली योग समिती महाराष्ट्र पश्चिम राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारीपदी विद्याधर पाटणकर यांची नियुक्ती झाली.
जिल्हा सहप्रभारीपदी दत्तात्रय निखार्गे, सोशल मीडिया जिल्हा प्रभारीपदी योगेश येरम, भारत स्वाभिमान न्यास सहजिल्हा प्रभारी म्हणून रावजी परब, जिल्हा महामंत्री विकास केरकर, जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे भारत स्वाभिमान न्यास (महाराष्ट्र पश्चिम) राज्य प्रभारी बापूजी पाडळकर, पतंजली योग समिती राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे, भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी डॉ. तुळशीराम रावराणे तसेच जिल्ह्यातील योगशिक्षक, योगसाधक आणि हितचिंतकांनी अभिनंदन केले. नवनियुक्त जिल्हा प्रभारी पाटणकर यांनी, वरिष्ठांच्या सुचनेनूसार व सर्वांच्या सहकार्याने रामदेव महाराज यांचे हे संघटन कार्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. लवकरच तालुका कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

