मळगाव येथे मंगळवारी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
मळगाव येथे मंगळवारी
जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः मळगाव-आजगावकर गोसावीवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे मंगळवारी (ता. ४) सायंकाळी सातला जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. दुर्वांकुर कला, क्रीडा मंडळातर्फे ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
या स्पर्धेत प्रथम ७००१ (दाजी आजगावकर पुरस्कृत), द्वितीय ५००१ (कै. आनंदी अमरे यांच्या स्मरणार्थ गितेश अमरे व प्रथमेश सावळ पुरस्कृत), तृतीय ३००१ (कै. लवू सहदेव कळंगुटकर स्मरणार्थ राजेश कळंगुटकर पुरस्कृत), उत्तेजनार्थ १५०० (सुहास मळगावकर) अशी पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह सिद्धेश आजगावकर यांनी पुरस्कृत केली आहेत. वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट हार्मोनियम (हेमंत तानावडे पुरस्कृत), उत्कृष्ट पखवाज (योगेश चिंदरकर पुरस्कृत), उत्कृष्ट तबलावादक (देवानंद राऊळ पुरस्कृत), उत्कृष्ट गायक (बंटी मेस्त्री पुरस्कृत), उत्कृष्ट झांज वादक (योगेश गवंडे पुरस्कृत), उत्कृष्ट कोरस (अक्षय राऊळ पुरस्कृत), शिस्तबद्ध संघ (श्री देव समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ मळगाव पुरस्कृत) आदी वैयक्तिक पारितोषिकेही आहेत. सर्व मंडळांना सन्मानचिन्ह चेतन राऊत यांनी पुरस्कृत केली आहेत.
भजन मंडळांमध्ये रात्री आठला श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे (बुवा-नरेंद्र मेस्त्री), ८.५० ला श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ, साटेली (सत्यनारायण कळंगुटकर), ९.४५ ला श्री ब्राह्मण देव प्रासादिक महिला भजन मंडळ, पावशी (प्रियांका तवटे), १०.३५ ला श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी (आशिष सडेकर), ११.२५ ला श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नेरुर (भार्गव गावडे), श्री सद्गुरू संगीत भजन मंडळ, पिंगुळी बुवा-वैभव सावंत (वेळ- मध्यरात्री १२.१५ ला), १.०५ ला श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली (योगेश मेस्त्री), १.५५ ला श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ, अणसूर-वेंगुर्ले (हर्षल मेस्त्री), पावणे तीनला श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ, कणकवली-जानवली (दुर्गेश मिठबावकर) आदी ९ संघ निमंत्रित केले आहेत. भजन मंडळांना प्रत्येकी ४५ मिनिटांचा कालावधी असेल. संदीप दळवी हे निवेदक आहेत. स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

