बांदा वाचनालयात १५ ला 
बालवाचक कथाकथन स्पर्धा

बांदा वाचनालयात १५ ला बालवाचक कथाकथन स्पर्धा

Published on

बांदा वाचनालयात १५ ला
बालवाचक कथाकथन स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून येथील नट वाचनालयातर्फे विष्णू गावकर, (आडाळी) पुरस्कृत त्यांची पत्नी (कै.) विजयालक्ष्मी विष्णू गावकर व सुपुत्र (कै.) बिपीन विष्णू गावकर यांच्या स्मरणार्थ बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १५ नाव्हेंबरला सकाळी दहाला येथील नट वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे.
ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित असून तिसरी ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन शालेय गटात होणार आहे. लहान गटासाठी ‘शौर्यकथा’ हा विषय असून वेळ चार मिनिटे आहे. मोठ्या गटासाठी ‘संतांच्या जीवनातील प्रसंग’ हा विषय असून वेळ पाच मिनिटे आहे. दोन्ही गटांतील पहिल्या तीन क्रमांकाना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील केवळ दोनच विद्यार्थी सहभागी होतील. या सभेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांची नावे संबंधित शाळांनी १२ नाव्हेंबरपर्यंत नट वाचनालयात आणून द्यावीत, असे आवाहन नट वाचनालयाने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com