जिजाऊ प्रभाग संघास आरोंदा येथे मार्गदर्शन
02100
‘महिला सहभागातून ग्रामविकासाला चालना’
आरोंद्यात कार्यशाळा; ‘उमेद’, ‘जिजाऊ प्रभाग’चा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ३ ः ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कुटुंबश्री एनआरओ, केरळ यांच्यातर्फे जिजाऊ प्रभागसंघ, आरोंदा यांच्यातर्फे पंचायतराज संस्था आणि समुदाय आधारित संस्था अभिसरण प्रकल्पांतर्गत प्रभागस्तरीय कार्यशाळा नुकतीच झाली. ग्रामपंचायत आणि समुदाय आधारित संस्थांमधील समन्वय अधिक दृढ करणे, तसेच ग्रामविकास प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढविणे, हा उद्देश होता.
प्रभाग समन्वयक हिरालाल पावरा यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. सरपंच सायली साळगावकर, तिरोडा सरपंच प्रियांका सावंत, नाणोस सरपंच अमिता नाणोसकर, सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, कवठणी उपसरपंच श्रद्धा कवठणकर, तळवणे सरपंच गोविंद केरकर, आरोंदा ग्रामपंचायत सदस्या सुभद्रा नाईक आदी उपस्थित होते. तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातून स्वाती रेडकर, रिद्धिमा पाटकर, शिवानंद गवंडे, मेंटॉर गिरिजा संतोष, श्रावणी वेटे, प्राची राऊळ यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. प्रभागसंघाच्या अध्यक्षा रेजिना डिसोझा, सचिव तन्वी परब, कोषाध्यक्षा अर्चना जाधव आदींनी सहभाग नोंदवला.
कार्यशाळेत गिरिजा संतोष यांनी प्रकल्पाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, ‘व्हीपीआरपी’ तयार करण्याची प्रक्रिया, ग्रामपंचायत स्तरावर समुदाय संस्थांची भूमिका, तसेच महिला सबलीकरणासाठी योजना व निधी एकत्रिकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. स्वाती रेडकर यांनी, ग्रामविकासासाठी महिला बचतगट आणि ग्रामपंचायत यांचा परस्पर समन्वय अत्यंत आवश्यक आहे. ‘पीआरआय-सीबीओ’ प्रकल्प महिलांना निर्णयप्रक्रियेत सक्रिय करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे नमूद केले. प्रभागसंघाने केलेल्या कामाचे सादरीकरण पाहून समाधान व्यक्त केले. ‘सीएलएफ’अंतर्गत रेजिना डिसोझा, अर्चना जाधव, अनुष्का तारी, स्नेहा पारिपत्ये, नम्रता नाणोसकर, तसेच बालसभा पदाधिकारी आयुष रगजी, सई पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतीक्षा शेट्ये यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

