शेतीप्रक्रियेत पक्ष्यांनाही महत्त्व
शेतकऱ्यांचे मित्र ः पक्षी भाग १----------लोगो
(२८ ऑक्टोबर टुडे तीन , लोगो बदलावा)
शेती आणि पर्यावरण संवर्धन यांमध्ये पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतीमध्ये नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण, वनीकरण, पिकांचे परागीभवन यासारख्या प्रक्रियामध्ये मदत करतात. पक्ष्यांच्या या कार्यामुळे रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी होते आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. आपल्या अधिवासातून पक्षी नष्ट झाले तर काय होईल, याचे उदाहरण चीनमध्ये १९६० च्या दशकात घडलेले होते...!
- rat3p1.jpg -
25O02115
- कुणाल अणेराव,
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी
सृष्टीज्ञान संस्था
------
शेतीप्रक्रियेत पक्ष्यांनाही महत्त्व
५ ते १२ नोव्हेंबर हा आठवडा राष्ट्रीय पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ५ नोव्हेंबर हा वन्यजीव अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन तर १२ नोव्हेंबर हा पक्षी निरीक्षणाचा वस्तूपाठ घालून देणारे ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली यांचा जन्मदिवस होय. त्या निमित्ताने भारतात ५ ते १२ नोव्हेंबर हा कालावधी पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आपल्या आयुष्यातील पक्ष्यांचे महत्त्व ठसवण्यासाठी लोकांमध्ये जाणीवजागृती करण्यासाठी विविध उपक्रम या सप्ताहात राबवले जातात, ज्यात आपल्या परिसरातील जंगल अथवा पाणवठ्याच्या भागात सकाळी निसर्गभ्रमण करत पक्षीनिरीक्षण करणे, तेथे दिसलेल्या पक्ष्यांची ऑनलाइन नोंदणी करणे, संकटग्रस्त पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रचार करणे, शाळांमध्ये पोस्टर बनवणे आणि चित्रकला स्पर्धा घेणे यासारखे विविध उपक्रम राबवले जातात.
रंगीबेरंगी पंख, सुरेल आवाज आणि आकाशात उडण्याची क्षमता यामुळे पक्ष्यांचे अद्भुत जग हे नेहमीच आपल्याला भुरळ पाडत राहिले आहे. अगदी लहानपणी एक घास काऊचा, एक घास चिऊचा करत आपण जेवलो आहोत तर चिमणी-कावळ्याच्या घरट्याच्या गोष्टी ऐकत आपण मोठे झालो आहोत. आपल्या संस्कृतीतही पक्ष्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. देवीदेवतांचे वाहनही पक्षी आहेत आणि राजघराण्याच्या प्रतिकांतही पक्षी होते. संगीत असो की कला, प्रत्येक ठिकाणी पक्षी आहेत. मानवांनी शतकानुशतके पक्ष्यांकडून प्रेरणा घेतली आणि उड्डाण तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली आहे. डार्विनने गॅलापागोस या बेटावरील फिंच पक्ष्याचा अभ्यास करून त्याचे उत्क्रांतीबद्दलचे विचार पक्के केले. जगभरातील प्रत्येक भागात पक्षी आहेत. त्यांची जीवनशैली ही अतिशय संवेदनशील असून, ते हवामानातील बदलांना त्वरित प्रतिसाद देतात. यामुळे, हवामान बदलासारख्या गंभीर समस्येची आणि त्याचा परिणाम म्हणून भेडसावणाऱ्या विविध आपत्तीची पूर्वसूचना पक्षी देतात.
चीन तेव्हा शेतीप्रधान देश होता. चीनच्या आर्थिक क्रांतीचे जनक माओला ‘दी ग्रेट लीप फॉरवर्ड’ ही मोहीम राबवून शेती आणि कारखानदारीत झपाट्याने वाढ घडवून आणायची होती. त्यासाठी त्याने अन्नधान्य पिकांची शेती ही सामूहिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. धान्य खाणाऱ्या चिमण्यांसारख्या पक्ष्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्याने ‘चिमण्या मारो आंदोलना’ ची अधिकृत सरकारी घोषणा दिली. सरकारचाच आदेश असल्याने जनतेने गावोगावी चिमण्या मारायला सुरुवात केली. कोणी बंदुकीने हजारो चिमण्या टिपल्या तर अनेकांनी ट्रकभर मारलेल्या चिमण्या सरकारी कार्यालयासमोर सादर करून बक्षिसे मिळवली. ही मोहीम दोन वर्षे चालू होती. यात लाखो चिमण्या व इतर पक्षी मारले गेले. याचा परिणाम म्हणून केवळ एक वर्षाच्या आत चीनचे शेती उत्पन्न घटले. मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांवर टोळधाडी पडल्या. शेतीचे उत्पन्न घटले त्यामुळे अन्नाअभावी १५ ते ५.५ कोटी लोकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जगाला महत्त्वपूर्ण संदेश दिला. निसर्गात प्रत्येक सजीवाचे स्वत:चे असे स्थान आहे आणि त्या प्रत्येकाला विशिष्ट अशी जबाबदारी पार पाडण्यासाठी दिली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे जेव्हा एखादा अधिवास अथवा सजीव नष्ट होतो तेव्हा ही साखळी तुटते आणि त्याचे परिणाम अर्थातच संपूर्ण जगाला भोगावे लागतात. राष्ट्रीय पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्ष्यांचे आपल्या आयुष्यातील तसेच शेती प्रक्रियेमधील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करणे, हाच या लेखाचा मुख्य उद्देश आहे.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

