-महाराष्ट्राच्या चित्ररथातून अष्टतत्व एकत्वाचा संदेश
- rat३p७.jpg-
२५O०२१२६
केवडिया (गुजरात): एकता परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सादरीकरण करणारी महाराष्ट्राचे कलाकार.
- rat३p८.jpg-
P२५O०२१२७
चित्ररथाचे नेतृत्व करणारे गुहागरचे सिद्धेश जालगावकर.
-----
महाराष्ट्राच्या चित्ररथाने खेचले सर्वांचे लक्ष
गुहागरचा सिद्धेश जालगावकरने केले नेतृत्तव ; गुजरातमध्ये एकता दिन कार्यक्रम
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३ ः देशाच्या अखंड एकतेचे प्रतीक आणि भारताचे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिवस परेड पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या परेडमध्ये महाराष्ट्राच्या आकर्षक व वैचारिक चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्ररथाचे नेतृत्व कोकणातील गुहागर तालुक्यातील जाणवळे येथील सिद्धेश जालगावकर यांनी केले.
‘अष्टतत्व, एकत्व विचारधारा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा मूलमंत्र तसेच शक्ती, ज्ञान, दृष्टी, सुरक्षा, योग आणि समृद्धीसारख्या तत्त्वांचे प्रभावी सादरीकरण करून महाराष्ट्राचे नाव देशभरात उज्ज्वल केले. जालगावकर यांनी केवळ नेतृत्वच नाही तर नृत्य दिग्दर्शनाची धुराही समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या संकल्पनाशिलतेने आणि कलात्मक दिग्दर्शनाने महाराष्ट्राच्या परंपरेचा व विचारधारेचा संगम प्रभावीपणे रंगमंचावर साकारला. या झक्कीमध्ये एकूण १४ नृत्यकलाकारांचा सहभाग होता. त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, वीरतेचा आणि एकतेचा संदेश नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. सहभागी कलाकारांमध्ये मयूर सोनवणे, शुभम सांगले, वेद खंडागले, श्लोक खंडागले, करण चौबे, मयुरेश कदम, मोनिका पाटील, रश्मी झा, संचिता इंदुलकर, दीक्षिता काटे, ध्रुव गद्दम, चैतन्य बोऱ्हाडे आणि मच्छिंद्र पाटील यांचा समावेश होता. केवडियातील एकता दिवस परेडमध्ये महाराष्ट्राच्या कलाकारांनी आपल्या उत्साहाने, नृत्यकौशल्याने आणि देशभक्तीने सजलेल्या सादरीकरणाने एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेला नव्या उंचीवर नेले.
----
चौकट
कलाकारांचे केले कौतुक
रथाच्या सादरीकरणाने केवडियाच्या प्रेक्षकांसह देशभरातून आलेल्या पाहुण्यांचेही मन जिंकले. महाराष्ट्राच्या चित्ररथाला लक्षवेधी सादरीकरण म्हणून विशेष दाद मिळाली. उपस्थित मान्यवरांनी कलाकारांचे कौतुक केले. एकता आणि अखंडतेचा विचार भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक श्वासात आहे. महाराष्ट्राच्या या चित्ररथाने त्या विचारांना सजीव रूप दिले, असे उपस्थितांनी आवर्जून सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

