४६ गावातील भातशेती चिखलात, शेतकरी चिंतेत

४६ गावातील भातशेती चिखलात, शेतकरी चिंतेत

Published on

-rat३p६.jpg-
२५O०२१२०
दापोली ः म्हाळुंगे येथील मोहन गोरिवले यांच्या शेतातील कापून ठेवलेले भातदेखील भिजून गेले.
-----
सततच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातचा घास हिरावला
दापोली तालुक्यातील ४७ गावातील भातशेती चिखलात ; १३५ हेक्टर क्षेत्र बाधित
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३ : परतीच्या अवकाळी पावसाने दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांचा हातचा घास हिरावला आहे. गेल्या पंधरवड्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे भात व नाचणी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे १३५ हेक्टर शेती बाधित झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये १२० हेक्टर भातशेती आणि १५ हेक्टर नाचणी शेतीचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण ७१० शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहेत.
तालुक्यामध्ये कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यामध्ये भातशेती ४ हजार ३७३, नाचणी शेती ६४६ तर तूर ८ हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सततच्या पावसामुळे भातपीक चिखलात रुतले आहे. काही ठिकाणी कापणी केलेल्या भातपिकाला पुन्हा कोंब फुटले असून, उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाने मागील पंधरा दिवसांपेक्षा अधिक हानी केली आहे. अनेक ठिकाणी भाताच्या लोंब्या कोसळून दाणे विखुरले असून ते पुन्हा रुजत आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत दापोली तालुक्यातील खालील ४७ गावांतील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये टाळसुरे, जोगेळे, मौजे दापोली, ताडील, सारंग, जालगाव, ब्राह्मणवाडी, साकुर्डे, बोरिवली, करंजाणी, मुरूड, कर्दे, आसूद, कळंबट, वाघवे, विसापूर, शिरखल, चिंचाळी, समशेरअली नगर, पालगड, पिसई, सोंडेघर, वनौशीतर्फे नातू, कोंढे, पोफळवणे, पांगरीतर्फे हवेली, देगावं, कोळबांद्रे, साखळोली, उन्हवरे, भडवळे, फरारे, आंजर्ले, केळशी, गव्हे, निगडे, अडखळ, लाडघर, मळे, आगरवायंगणी, उसगाव, उंबर्ले, निगडे, माथेगुजर, भोपण, चिखलगाव या गावांचा समावेश आहे. अजूनही काही गावांचा समावेश होण्याची शक्यता असून, पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानुसार, कृषी विभागाने तातडीने पथके पाठवली असून, दोन दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हेमंत ठोंबर यांनी दिली.
दरम्यान, गेल्या १५ दिवसांच्या पावसाने कापणीस तयार असलेली भातशेती पूर्णतः बाधित झाली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने भात सुकवण्याच्या जागाही पाण्याखाली गेल्या आहेत. शेतकऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून, कडवा, पावटा, भाजीपाला आणि कंदमुळे लागवडीची कामे रखडली आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. परतीच्या पावसाने भातशेतीसोबत शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या आहेत.
---
कोट
गेल्या पंधरा दिवसांच्या पावसाने भातशेती भुईसपाट झाली आहे. हातचा घास हिरावला गेला आहे. शासनाने तातडीने मदत दिली नाही, तर शेतकरीवर्ग सावरणे कठीण होईल.
- दिनेश आईनकर, शेतकरी, शिवनेरी (दापोली)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com