''ऑन कॉल'', ''आभाळमाया''च्या सदस्यांचे तातडीने रक्तदान
‘ऑन कॉल’, आभाळमाया’च्या
सदस्यांचे तातडीने रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ : एका दिवसातच सिंधुदुर्ग आणि गोव्यातील रुग्णालयांमध्ये पाच रुग्णांना रक्ताची तातडीची आवश्यकता भासल्याने ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था’ आणि ‘आभाळमाया ग्रुप’च्या १३ सदस्यांनी पुढाकार घेत तातडीने रक्तदान करून पाच जीव वाचवले. या सर्व रक्तदात्यांच्या तत्परतेमुळे रक्ताच्या टंचाईच्या काळातही गंभीर रुग्णांना वेळेत रक्त मिळून त्यांचे प्राण वाचले.
गोवा मेडिकल कॉलेज (GMC) बांबोळी येथे एका रुग्णाच्या बायपास सर्जरीसाठी एबी पॉझिटिव्ह रक्ताची गरज भासली. त्यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित रक्तदाते आनंद देसाई, भूषण मालवणकर, जयदीप पडवळ, रामचंद्र भालेकर, शेखर दळवी तसेच आभाळमाया ग्रुपचे सदस्य संदीप कर्पे यांनी तातडीने जीएमसी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. त्याच दिवशी एस. एस. पी. एम. लाईफटाइम हॉस्पिटल, पडवे येथे एका रुग्णाच्या बायपास सर्जरीसाठी ओ पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. यावेळी संस्थेचे सदस्य सुहास राऊळ, स्वप्नील मेस्त्री, दर्शन राऊळ आणि दत्ता मेस्त्री यांनी रक्तदान केले. तसेच ओटवणे येथील एका रुग्णाच्या सर्जरीवेळी नियमित रक्तदाता चेतन देसाई यांनीही रक्तदान करून मदत केली.
सावंतवाडीतील राणी जानकीबाई रुग्णालयात ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची गरज भासल्याने संस्थेचे नियमित रक्तदाता गिरीश सावंत यांनी रात्री साडेआठ वाजता एस. एस. पी. एम. रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. रक्तसंकलनाच्या वेळी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी मनिषजी यादव यांचे सहकार्य लाभले. रात्री उशिरा मातोंड येथील एका फ्रॅक्चर रुग्णासाठीही संस्थेमार्फत रक्तदाता आणि रक्तदाता कार्ड देऊन रक्ताची सोय करण्यात आली. या सर्व उपक्रमात पंढरी सावंत, सिद्धेश परब, विनायक वर्णेकर, दशरथ गडेकर, तसेच ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे महेश रेमुळकर (कार्याध्यक्ष), बाबली गवंडे (सचिव), सिद्दार्थ पराडकर (खजिनदार) आणि आभाळमाया ग्रुपचे गणेश मोरजकर व रोहन कदम यांनी समन्वय साधला. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी एकाच दिवशी पाच रुग्णांना जीवनदान देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले आणि या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

