रत्नागिरी-कोकण रेल्वेच्या संचालकपदी राजीव कुमार मिश्रा

रत्नागिरी-कोकण रेल्वेच्या संचालकपदी राजीव कुमार मिश्रा

Published on

02209
कोकण रेल्वेच्या
संचालकपदी राजीव कुमार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये संचालक (वे अँड वर्क्स) म्हणून राजीव कुमार मिश्रा यांनी १ ऑक्टोबरपासून पदभार स्वीकारला आहे. ते भारतीय रेल्वेसेवेतील १९९२ बॅचचे अधिकारी आहेत. कोकण रेल्वेमध्ये येण्यापूर्वी त्यांनी मध्यरेल्वे येथे मुख्य ट्रॅक इंजिनिअर म्हणून काम केले आहे.
आयआयटी रूरकी येथून मिश्रा यांनी बीई (सिव्हिल), आयआयटी दिल्ली येथून एमटेक् (बिल्डिंग सायन्स अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट), जेबीआयएमएस, मुंबई येथून एमएफएम (फायनान्शियल मॅनेजमेंट) आणि मुंबई विद्यापिठातून एलएलबी पदवी प्राप्त केली आहे. रेल्वे पायाभूत सुविधा बांधकाम, देखभाल, नूतनीकरण आणि सुधारणा या क्षेत्रात त्यांना ३१ वर्षांहून अधिक व्यापक अनुभव आहे तसेच प्रकल्प व्यवस्थापन, बजेट नियंत्रण, मनुष्यबळ नियोजन, साठा व्यवस्थापन, कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबई उपनगरीय विभाग, भोर (खंडाळा) आणि थळ (कसारा) घाट यांसारख्या अत्यंत आव्हानात्मक विभागांचा विकास तसेच अनेक नवीन ब्रॉडगेज आणि दुहेरीकरण प्रकल्पांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे - मिरज दुहेरीकरण प्रकल्प, पनवेल - कर्जत, नगर - बीड- परळी वैजनाथ आणि लोणंद - फलटण या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पांवर तसेच विविध प्रकल्पांसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले गेले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना दोनदा महाव्यवस्थापक पुरस्कार तसेच दोनदा महाव्यवस्थापक सर्वोत्तम बांधकाम युनिट पुरस्कार मिळाले आहेत.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com