-सप्तलिंगी नदीत बुडून पूर येथील तरुणाचा मृत्यू

-सप्तलिंगी नदीत बुडून पूर येथील तरुणाचा मृत्यू

Published on

rat३p३.jpg-
२५O०२११७
मृत अजय अशोक कांबळे

सप्तलिंगी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ३ ः संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील तरुणाचा सप्तलिंगी नदीत बुडून मृत्यू झाला. २ नोव्हेंबरला दुपारी ही घटना घडली. अजय अशोक कांबळे (वय ३५, पूर-बौद्धवाडी, देवरूख) असे मृत तरुणाचे नाव आहे. अजय याची पत्नी सप्तलिंगी नदीवर रविवारी (ता. २) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेली होती. या वेळी अजयही त्या ठिकाणी गेला होता. त्याला नदीच्या पलीकडे पारोसे (वेलभाजी याची भजी केली जातात) दिसले. दरम्यान, याचवेळी पत्नी धुतलेले कपडे घरी ठेवण्यासाठी गेली होती. अजय याने ते पारोसे काढण्यासाठी नदी पोहून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला खोलवर पाणी असल्याने त्याला अंदाज आला नाही आणि याच पाण्यात तो गटांगळ्या खाऊ लागला. नदीवर कपडे धुवत असलेल्या दुसऱ्या एका महिलेने ही घटना पाहिली आणि तिने आरडाओरडा केला. तिच्या आवाजाने अजय याची पत्नी धावत आली. तिने आपल्या पतीला बुडताना पाहून हंबरडा फोडला. त्याला वाचवण्यासाठी दोघीही आरडाओरडा करत होते. गावातील काही नागरिक या ठिकाणी जमा झाले. त्यांनी अजयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सापडला नाही. याबाबतची माहिती देवरूख पोलिसांना देण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. त्यांना ४ वर्षाचा मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com