क्राईम

क्राईम

Published on

नदीचे पाणी दूषित करणाऱ्या
कंपन्यांविरोधात सरपंचांची तक्रार
सकाळ वृत्तसेवा
खेड ः तालुक्यातील कोतवली गावातील सोनपात्रा नदीतील पाणी दूषित केल्याप्रकरणी गावाच्या सरपंच अक्षता महेश तांबे (वय३३) यांनी संबंधित कंपन्यांविरोधात खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीनुसार २ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री तीन प्रमुख कंपन्यांसह लोटे एमआयडीसीतील अन्य काही कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर भारतीय न्यायसंहिता अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच अक्षता तांबे यांनी सांगितले की, लोटे एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांकडून केमिकलयुक्त सांडपाणी सोनपात्रा नदीत सोडले जात असल्याने कोतवली गावातील ग्रामस्थ व जनावरे आजारी पडत आहेत तसेच शेती व मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. नदीचे पाणी दूषित व अनुपयोगी झाल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत असून, या प्रकरणी पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.
----
(पट्टा)
अल्पवयीन मुलाशी
असभ्य वर्तन
खेड, ता. ३ : जिल्ह्यातील एका गावातील ११ वर्षीय बालकाशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी रवी नरसिंहनारायण सिंग (३५, रा. बिहार) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २९ ऑक्टोबरला घडल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पीडित मुलगा घराबाहेर खेळण्यासाठी गेला असता संशयिताने त्याला बोलावून त्याच्याशी असभ्य वर्तन केले. ही बाब त्यांनी घरच्यांच्या कानांवर घातल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड करत आहेत.

फुरूस येथे
गुटखा जप्त
खेड ः तालुक्यातील फुरूस येथील एका टेलरिंग दुकानात विनापरवाना विक्रीसाठी ठेवण्यात आलेला १० हजार ७२० रुपयांचा गुटखा खेड पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी करण्यात आली.
दापोली पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा आदित्य हिरेमठ यांच्या फिर्यादीनुसार, संशयित वाहिद अब्दुल कादिर परकार (वय ५१, रा. फुरूस बौद्धवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहिद परकार यांनी आपल्या फुरूस येथील टेलरिंग दुकानात गुटखा विक्रीसाठी ठेवला होता. त्या वेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडत सदर गुटखा जप्त केला. पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.

पतीच्या मारहाणीत
पत्नी जखमी
खेड ः तालुक्यातील कोतवली-समोरची भोईवाडी येथे क्षुल्लक कारणावरून पतीने केलेल्या मारहाणीत ७० वर्षीय पत्नी जखमी झाल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. जखमी चंद्रप्रभा चंद्रकांत लवंदे (वय ७०) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती चंद्रकांत लक्ष्मण लवंदे यांनी घरातील वॉशिंग मशिन वापरल्यावरून वाद घालून त्यांना शिवीगाळ केली, हाताने थापड मारली आणि चुलीतील लाकडाने मारहाण करून दुखापत केली. या घटनेवरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दोन संशयित
गांजासह अटक
खेड ः तालुक्यातील मुंबके ते कोरेगावदरम्यान मुख्य रस्त्यालगत गांजा या अमली पदार्थांसह २२ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल खेड पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी करण्यात आली. खेड पोलिस ठाण्याचे शिपाई विजेंद्र रमेश सातार्डेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राहीद अब्दुल रऊफ जमादार (वय ३५) आणि मुरसलीन बशीर नाडकर (वय ३०, दोघेही रा. संगलट मोहल्ला, खेड) या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहीद जमादार व मुरसलीन नाडकर हे दोघे विक्रीकरिता सुमारे १६२ ग्रॅम वजनाचा, २,४२५ रुपये किंमतीचा सुकलेला गांजा प्लास्टिक पिशवीत बाळगत होते. त्यांच्याकडून अनुक्रमे १० हजार रुपयांचे दोन मोबाईल आणि अमली पदार्थ असा एकूण २२ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com