रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आज आंदोलन

रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आज आंदोलन

Published on

रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आज आंदोलन
कुडाळ : कुडाळ - मालवण राज्यमार्गावरील खड्डेमय स्थितीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्या (ता.४) सकाळी साडेदहाला होबळीचा माळ, कुडाळ येथे बैलगाडीद्वारे जनआंदोलन करणार आहे. या आंदोलनात माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार आहेत. कुडाळ-मालवण रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार अपघात घडून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तरीही स्थानिक आमदार, खासदार व पालकमंत्री यांना याची पर्वा नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या जीवितरक्षणासाठी व प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला अमरसेन सावंत, श्रेया परब, राजन नाईक, हरी खोबरेकर, बबन बोभाटे, मंदार शिरसाट, मंदार ओरसकर, अतुल बंगे, कृष्णा धुरी, सचिन कदम, बाळा कोरगावकर, योगेश धुरी, वंदेश ढोलम, शिवा भोजने आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे यांनी केले आहे.
-----------------
देवगड येथे ११ रोजी आरोग्य चिकित्सा शिबिर
देवगड : येथील लाईफ लाईन फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.११) सकाळी ९ ते १२ या वेळेत डॉ. आठवले कॅम्पस येथे मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. विविध तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. शिबिरासाठी डॉ. महादेव पोकळे उपस्थित राहणार आहेत. तसेच येथील नॅब आय रुग्णालयातर्फे रुग्णांच्या डोळ्याची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक त्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. शिबीराचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुनील आठवले यांनी केले आहे.
---
गोठोस धनगरवाडीत आज दशावतारी नाटक
सावंतवाडी : गोठोस-धनगरवाडी येथील युवा मित्र मंडळ यांच्या वतीने समाज मंदिरात उद्या (ता.४) रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतारी नाट्य मंडळ, आरोस-दांडेली यांचा भव्य पौराणिक नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. यावेळी समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तसेच जेष्ठ नागरिक आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. पंचक्रोशीतील नाट्यरसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा मित्र मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com