कणकवलीत ७ ते ९ नोव्हेंबरला त्रिसूत्री संगीत महोत्‍सव
कणकवलीत ७ ते ९ नोव्हेंबरला त्रिसूत्री संगीत महोत्‍सव

कणकवलीत ७ ते ९ नोव्हेंबरला त्रिसूत्री संगीत महोत्‍सव कणकवलीत ७ ते ९ नोव्हेंबरला त्रिसूत्री संगीत महोत्‍सव

Published on

2311
पंडित शौनक अभिषेकी, पं. राम शंकर (बनारस), धवल जोशी, सुजाता गावडे

कणकवलीत ७ ते ९ नोव्हेंबरला त्रिसूत्री संगीत महोत्‍सव
आचरेकर प्रतिष्‍ठानचे आयोजन : पं. शौनक अभिषेकी यांच्यासह आघाडीच्या कलाकारांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ : येथील आचरेकर प्रतिष्‍ठानच्या संकुलात ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ‘त्रिसूत्री’ संगीत महोत्‍सव होणार आहे. गायन, वादन आणि नृत्‍याचा आविष्कार असलेल्‍या या कार्यक्रमात पंडित शौनक अभिषेकी आणि त्‍यांच्या शिष्‍यांसह मान्यवर सहभागी होणार आहेत. त्रिसूत्री संगीत महोत्‍सवाच्या निमित्ताने वामनदाजी शास्त्रीय संगीत स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत राज्य व राज्या बाहेरील ३० गायक स्पर्धेकांनी आपला सहभाग नोंदवला होता. प्राथमिक फेरीतून त्यातील ११ स्पर्धक स्पर्धकांना अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आलेला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी ७ नोव्हेंबर सकाळी ९ वाजता नगरपंचायत कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते व सघनगान केंद्राचे गुरू पं. समीर दुबळे, पं. राम शंकर (बनारस), तबला प्रशिक्षण केद्रांचे गुरु चारुदत्त फडके यांच्या उपस्थितीत होणार आहे.
संध्याकाळी ७ वाजता वामनदाजी शास्त्रोक्त संगीत स्पर्धेचा विजेता याचे गायन होईल. त्‍यानंतर संस्थेच्या सघनगान केद्रांची विद्यार्थीनी सानिका गावडे हिचे गायन झाल्‍यानंतर कलाकार पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने सदर गायन मैफिलीची सांगता होणार आहे. शनिवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता सदर त्रिसूत्री उपक्रमातील रसग्रहण कार्यशाळा होणार आहे. यात गायक व गुरु पं. राम शंकर (बनारस) हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत ‘रामाश्रय यांच्या बंदिशीं’ या विषयावर अभ्यास व मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा शनिवारी दोन सत्रात व रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा तीन सत्रात होणार आहे. याच दिवशी संध्याकाळी सात वाजता संस्थेच्या तबला प्रशिक्षण केद्रांचे विद्यार्थी अर्थव पिळणकर व वेदांत कुयेस्कर यांचे तबला वादन होईल. त्‍यानंतर पुणे येथील वासरी वादन धवल जोशी पुणे (पं. केशव गिंडे) यांचे शिष्य यांचे बासरी वादन होऊन सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सुजाता गावडे यांच्या नृत्य अविष्काराने दुसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.
रविवार ९ नोव्हेंबर सायंकाळी सात वाजता निलेश धाक्रस ( पुणे ) यांच्या गायनाने या संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या मैफिलीचा प्रारंभ होणार आहे. या महोत्सवाची सांगता पं. राम शंकर (बनारस) यांच्या गायन मैफिलीने होणार आहे. या महोत्सवात हार्मोनियम साथ अदिती गराडे (पुणे) व स्वरुप दिवाण (कोल्हापूर) व तबला साथ चारुदत्त फडके यांची साथ संगत लाभणार आहे. या रसग्रहण कार्यशाळा आणि संगीत महोत्सवाबाबत इच्छूक प्रशिक्षणार्थी, संगीत प्रेमी रसिकांनी अधिक माहितीकरीता संस्थेच्या सहकार्यवाह सीमा कोरगांवकर संपर्क साधावा असे आवाहन आचरेकर प्रतिषठानतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com