दोन दिवसांचे मोबाईल प्रशिक्षण

दोन दिवसांचे मोबाईल प्रशिक्षण

Published on

rat४p१.jpg-
P२५O०२३१३
रत्नागिरी ः कुवारबाव येथे आयोजित मोबाईल प्रशिक्षणावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना अष्टपैलू स्मार्ट फोन हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
---
कुवारबावमध्ये ज्येष्ठांना मोबाईल प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः आतंरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र-भारत या स्वयंसेवी संस्थेतर्फे कुवारबाव परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोबाईल प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात नुकतेच झाले. दोन दिवसांच्या या मोबाईल प्रशिक्षणाला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ४० स्त्री-पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी संधीचा लाभ घेतला.
घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीच्यावतीने तज्ज्ञ व्यक्तीमार्फत हे प्रशिक्षण देण्यात आले होते. एलआयसी-आयचे नंदकुमार सकट व सुशांत सोनवणे-पुणे या दोन तज्ञांनी ज्येष्ठांना समजेल, अशा पद्धतीने मोबाइलच्या कार्यपद्धतीविषयी, सुयोग्य वापराविषयी, मोबाइलमधील विविध सोयीविषयी व सायबर गुन्ह्याविषयी, फसवणुकीच्या पद्धतीविषयी उदाहरणे देऊन तसेच मोठ्या स्क्रीनद्वारे माहिती दिली. प्रत्येकाला वैयक्तीक मार्गदर्शन करून मोबाइलमधील माहीत नसलेल्या बाबी प्रत्यक्ष कृती करून घेऊन समजावल्या. अनेक ज्येष्ठ नागरिकाला कधीही ‘मेल’ केले नव्हते अशा प्रत्येकाकडून ‘मेल’ तयार करून पाठवण्यात आला.
या वेळीज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती आंब्रे यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक सुशांत सोनवणे व नंदकुमार सकट यांचा सन्मान केला. या विषयी विनायक हातखबकर, प्रकाश शिंदे, सुवर्णा चव्हाण, मारूती आंब्रे यांनी अभिप्राय नोंदवले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश बोरकर, शामसुंदर सावंतदेसाई, प्रकाश बोरकर, वृषाली धाणेकर, शुभांगी भावे, कोकजे यांनी विशेष परिश्रम घेतले. दोन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना सुश्रुत कुलकर्णी यांचे अष्टपैलू स्मार्टफोन हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com