सोनवडे नदीवर विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा

सोनवडे नदीवर विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा

Published on

- rat४p८.jpg-
२५O०२३६०
संगमेश्वर ः श्रमसंस्कार शिबिरातील सहभागी विद्यार्थी स्वयंसेवकांसोबत स्थानिक संस्था पदाधिकारी, प्रशालेतील कर्मचारी आणि महाविद्यालयाचे शिक्षकवृंद.
---
सोनवडे नदीवर विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा
आठल्ये-सप्रेचे विद्यार्थ्यांचा पुढाकार ; श्रमसंस्कार शिबिरात परिसर स्वच्छतेवर भर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः तालुक्यातील सोनवडे गावात स्वच्छतामोहीम राबवतानाच गावातील नदीवर बंधारा बांधून आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावातील शाळा परिसर स्वच्छ करतानाच रस्त्यावरील खड्डेही बुजवले.
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिराची सांगता माध्यमिक विद्यालय सोनवडे येथे झाली. या प्रसंगी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, सोनवडेचे सरपंच अंकुश राऊत, पोलिस पाटील अनंत जोशी, सीमा खेडेकर, संजय खेडेकर, राजन खेडेकर, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे यांनी सात दिवसांच्या श्रमसंस्कार शिबिराच्या कार्याचा आढावा घेतला.
स्वयंसेवकांनी श्रमसंस्कार शिबिरामध्ये केलेल्या श्रमदानामध्ये शालेय परिसर स्वच्छता केली तसेच परिसरातील झाडांना आधार देऊन पाण्यासाठी आळी बनवली. जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर, सोनवडे येथे साफसफाई करून शाळेसाठी परसबाग तयार केली. रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी स्वयंसेविकांनी नदीतील वाळू व दगड फोडून खड्डे बुजवण्याचे काम केले. तसेच सोनवी नदीमध्ये बंधारा बांधून तेथील पायवाट साफ केली. सोनवडे गावच्या प्रवेशद्वारापासून ते हायस्कूलपर्यंतच्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली तसेच बौद्धिक सत्रात प्रभाकर सनगरे, दत्ताराम सोलकर, शंकर धामणे, प्रतीप शिवगण, अमित पंडित यांनी मार्गदर्शन केले. प्रा. स्वप्नाली झेपले यांनी कापडी पिशव्या निर्मितीचे प्रशिक्षण दिले. प्रा. मयुरेश राणे यांनी अळंबी लागवड प्रशिक्षण तसेच इकोप्रिंटिंग प्रशिक्षण दिले. मुलींसाठी प्रा. देवयानी जोशी यांनी मेहंदी प्रशिक्षण दिले.
---
चौकट
मैत्री ठरला सर्वोत्कृष्ट गट
श्रमसंस्कार शिबिरामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमावेळी झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत मिलिंद जांगळी, नीशा पांगळे, सानिका सनगले विजेते ठरले. शिबिरातील सर्वोत्कृष्ट गट म्हणून ‘मैत्री’ ग्रुपची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट गटप्रमुख म्हणून श्रेया ठोंबरे (गट क्र.२ ‘मैत्री’) हिला गौरवण्यात आले. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मुलांमध्ये मिलिंद जांगळी, लक्षित जाधव, यश लाखण यांना तर मुलींमध्ये प्रांजली गेल्ये, श्रेया पवार, अक्षरा कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट डायरी लेखनाचा पुरस्कार सानिया मुंडेकर, श्रेया पवार, प्रांजली गेल्ये यांनी प्राप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com