रत्नागिरी- जोशी, नाटेकर, डॉ. देवस्थळी, डॉ. गणपत्ये, डॉ. घाटे यांना पुरस्कार

रत्नागिरी- जोशी, नाटेकर, डॉ. देवस्थळी, डॉ. गणपत्ये, डॉ. घाटे यांना पुरस्कार

Published on

rat4p4.jpg-
02316
प्रवीण जोशी, डॉ. पंकज घाटे, मीरा नाटेकर, शोभा नाखरे, डॉ. अश्विनी गणपत्ये, डॉ. अश्विनी देवस्थळी.
------------

जोशी, नाटेकर, डॉ. देवस्थळी, डॉ. गणपत्ये, डॉ. घाटे यांना पुरस्कार
कऱ्हाडे ब्राह्मण संघ ; ९ नोव्हेंबरला वितरण, शोभा नाखरे यांचे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाने पाच विशेष पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकप्राप्त प्रवीण जोशी, पुणे ते अयोध्या १४०० किमी सायकलने प्रवास करणाऱ्या डॉ. अश्विनी गणपत्ये, पीएचडी मिळवल्याबद्दल डॉ. अश्विनी देवस्थळी व डॉ. पंकज घाटे यांचा समावेश आहे. तसेच शारदापीठ शृंगेरी येथे झालेल्या संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ परीक्षेत प्रथम क्रमांकप्राप्त मीरा नाटेकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वा. राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या प्रसंगी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका शोभा नाखरे यांचे संकल्प सकारात्मकतेचा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शोभा नाखरे या दी सेंट्रल स्कूल फॉर दी डेफ या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका असून, त्या कर्णबधीर मुलांना शिकवतात, दहावीच्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. एनसीईआरटी दिल्लाची राष्ट्रीय पुरस्कार व कर्तृत्ववान महिला महापौर पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत.
प्रवीण जोशी हे रा. स्व. संघाचे लहान वयापासून स्वयंसेवक आहेत. मनाच्या श्लोकांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत नातवंडांच्या प्रेरणेने त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला व ७० श्लोक अर्थासह पाठ करून स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. पुरस्कारप्राप्त डॉ. अश्विनी देवस्थळी यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक आंबा उत्पादकांच्या संदर्भात कौटुंबिक व्यवसायाचे आर्किटेक्चर या विषयावर पीएचडी केली. त्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात बीएमएस विभागप्रमुख आहेत. चिपळूणच्या डॉ. अश्विनी गणपत्ये यांनी पुणे ते अयोध्या १४०० किमी सायकल यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली. त्या माजी सैनिकांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत. त्या उत्तम सायकलपटू व धावपटू आहेत.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक डॉ. पंकज घाटे यांनी वसाहतीच्या शासनकाळातील दक्षिण कोकणातील सामाजिक-राजकीय संक्रमण (१८५७ ते १९४७) या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांनी २ संशोधन प्रकल्प, ८ संशोधन पेपर्स पूर्ण केले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई यांनी केले आहे.

चौकट
भगवद्गीता कंठस्थ
मीरा नाटेकर यांनी जून २०२५ मध्ये शृंगेरी येथील श्री शंकराचार्यांच्या पिठाच्या संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शंकराचार्यांच्या हस्ते २१ हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक मिळवले आहे. त्यांनी दुर्गासप्तशतीचे शेकडो पाठ केले आहेत. २५ वर्ष स्वानंद पठण मंडळात संस्कृत स्तोत्रांचे नैमित्तिक पठण करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com