गुहागर-गुहागरातील क्रीडांगण नष्ट होण्याचा धोका
०२४२५
गुहागरातील क्रीडांगणावर बांधकामे नको
ब्ल्यू फ्लॅग प्रकल्प ः नागरिक, क्रीडाप्रेमींचे आमदार जाधव यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ४ ः ब्ल्यू फ्लॅग प्रकल्प राबवताना गुहागर शहरातील एकमेव क्रीडांगण नष्ट होण्यापासून संरक्षण करण्याबाबत आमदार भास्कर जाधव यांना गुहागर शहरातील काही नागरिक व क्रीडाप्रेमींनी निवेदन दिले.
शहरातील एकमेव व ऐतिहासिक पोलिस क्रीडांगण हे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, खेळाडू आणि सामाजिक संस्थांसाठी गेली अनेक दशके केंद्रबिंदू राहिले आहे. या मैदानावरच विविध शालेय, क्रीडा, सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यक्रम होतात. अलीकडे ब्ल्यू फ्लॅग बीच प्रकल्पाच्या नावाखाली या मैदानावर बांधकामे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या कामांमुळे मैदानाचा मूळ आकार, वापर व ओळख नष्ट होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
ब्ल्यू फ्लॅग प्रकल्पाला विरोध नसून पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटनाचे स्वागतच आहे; परंतु या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत स्थानिकांच्या मतांची दखल न घेता खेळाचे मैदान नष्ट होईल, अशा रचनेची कामे केली जाणे हे अन्यायकारक आहे. क्रीडांगण नष्ट झाल्यास स्थानिक क्रीडा संस्कृतीचा पाया कोसळेल तसेच पुढील पिढ्यांना खेळण्याची जागा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे ब्ल्यू फ्लॅग प्रकल्पांतर्गत पोलिस क्रीडांगणावर कोणतेही बांधकाम, पार्किंग वा कायमस्वरूपी रचना उभारली जाणार नाही, याची लेखी खात्री द्यावी. खेळाच्या क्रीडांगणाचे संपूर्ण क्षेत्र कायम राखून त्याचे सुशोभीकरण (स्वच्छता, फेन्सिंग, बसण्याची सोय इ.) करण्यात यावे. मुलांसाठी आणि खेळाडूंसाठी हे क्रीडांगण गुहागर क्रीडांगण आरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावे. गुहागर शहराच्या संदर्भातील सर्व महत्वाच्या प्रकल्पाचे आराखडे व प्रस्ताव सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करून स्थानिक नागरिकांना व समाजसंस्थांना विश्वासात घेण्यात यावेत, असे नागरिक व क्रीडाप्रेमींनी यांनी म्हटले आहे.
पोलिस कवायत
मैदानाची जागा शासकीय
या प्रकल्पामध्ये गुहागरचे नाव घेतल्यानंतर पोलिस मैदानावर पार्किंग आणि पर्यटकांना सोयीसुविधा अशा संदर्भात पोलिस कवायत मैदान विकसित करावे, असा विषय समोर आला. याबाबत काहींनी नगरपंचायतीला जबाबदार धरले; मात्र नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी सभा घेऊन सदर पोलिस कवायत मैदान ही शासनाची जागा असल्यामुळे शासनाने या संदर्भात निर्णय घेतला आहे. अजूनही यामध्ये कोणती गोष्ट करायची की, नाही हे ठरलेले नाही. नगरपंचायतीने यासाठी कोणतीही जागा दिलेली नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

