चिपळूण-चिपळुणातील राजकीय फलक हटवले

चिपळूण-चिपळुणातील राजकीय फलक हटवले

Published on

rat4p18.jpg-
02438
चिपळूण ः शहरातील जाहिरातीचे फलक काढताना पालिकेचे कर्मचारी.
--------

चिपळुणातील राजकीय फलक हटवले
आचारसंहिता लागू ; १२ कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ः नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांना सुरवात केली आहे. शहरातील विविध भागात उभारलेले राजकीय फलक हटवण्यास सुरवात झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
नगरपालिका निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आठ दिवसांपूर्वीच फलक जप्तीची मोहीम राबवली. यात मुदतबाह्य व अनधिकृत फलक हटवण्यात आले; मात्र त्यानंतरही काही परवानाधारक असलेले फलक शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आले होते. त्यामध्ये काही राजकीय फलक होते. त्यावर मंगळवारी आचारसंहिता लागू होताच कारवाई करण्यात आली. १२ कर्मचाऱ्यांनी २ वाहनांच्या मदतीने शहरातील बहादूरशेखनाका, मार्कंडी, पाग पॉवरहाऊस, चिंचनाका, बाजारपेठ, बाजारपूल, गोवळकोट, उक्ताड, भेंडीनाका आणि महामार्गावरील राजकीय व अन्य फलकही तातडीने हटवण्यात आले.
या मोहिमेसाठी पालिकेने स्वतंत्र पथक तयार केले असून, आगामी काळात हे पथक कार्यरत राहणार आहे. त्यामुळे राजकीय स्वरूपाचे फलक व अनधिकृत उभारल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com