कोकण
दोडामार्ग अजित पवार गट राष्ट्रवादी अध्यक्षपदी देसाई
03354
दोडामार्ग अजित पवार गट
राष्ट्रवादी अध्यक्षपदी देसाई
दोडामार्ग, ता. ९ : दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रभारी तालुकाध्यक्षपदी कुडासे येथील मेघेंद्र देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिले. त्यांची ही निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनुसार करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून देणार असल्याचे यावेळी देसाई यांनी सांगितले.

