सैतवडेत बीएसएनएल सेवेचा बोजवारा
सैतवडेत बीएसएनएल सेवेचा बोजवारा
रत्नागिरी ः तालुक्यातील सैतवडे गावात गेले दहा दिवस बीएसएनएनच्या फायबर सेवेचा बोजवारा उडालेला आहे. काही मिनिटासाठी सेवा चालू होते आणि पुन्हा बंद पडते. याबाबत संबंधितांकडे तक्रार केली तर तात्पुरती सेवा सुरू केली जाते. पुन्हा जैस थे अशी स्थिती आहे. मागील शुक्रवारी बंद झालेले वायफाय १० दिवसांनी सुरू झाले. परंतु तासाभरात पुन्हा बंद झाले. या सेवेमुळे ग्राहक संतप्त झालेले असून हे असेच सुरु राहणार असेल तर सर्व ग्राहक जोडण्या काढून टाकतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बने शैक्षणिक संकुलात मूल्यवर्धन प्रशिक्षण
साडवली : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख बीट क्रमांक १ मधील सर्व शाळांचे पहिली ते आठवीच्या वर्गातील शिक्षकांसाठी आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम पी. एस. बने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुलात झाला. रोहन बने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि एससीआर यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेतले जात आहे. या कार्यक्रमाला प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून समीर काबदूले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय प्रतिनिधी आणि शिक्षक सेवेत कार्यरत असलेल्या सुरेश बावदाने यांनी केले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट हे की संविधानीक तत्त्व, समाजभान आणि प्रत्येकाची वैयक्तिक देशाप्रती जबाबदारी या भावनांचा उमलत्या बालमनावर अध्ययनातून संस्कार घडविणे हा आहे.
फोटो ओळी
- rat9p22.jpg-
रत्नागिरी ः इम्तियाज सिद्दिकी यांचा सत्कार करताना मुख्याध्यापिका मुनवर तांबोळी. सोबत अन्य सर्व शिक्षक.
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत
इम्तियाज सिद्दिकी द्वितीय
रत्नागिरी ः सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत
रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूलचे विज्ञान शिक्षक इम्तियाज सिद्दिकी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मुलुंड मुंबई येथील कालिदास नाट्य सभागृहात पारितोषिक वितरण झाले. या कार्यक्रमासाठी आमदार मिहीर कटारिया, विक्रम पाटील, संजय जगताप, श्रीकांत भारती तसेच आरबीआय व नाबार्डचे संचालक सतीश मराठे, पतपेढीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सिद्दिकी यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती मुनव्वर तांबोळी, तालीमी इमदिया कमिटीचे अध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निसार लाला, सचिव तन्वीर मिस्त्री, खजिनदार जाहिर मिस्त्री, सहसचिव शकील मजगांवकर, पर्यवेक्षक मुश्ताक आगा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

