कणकवलीत ‘भजन संध्या’ उत्साहात

कणकवलीत ‘भजन संध्या’ उत्साहात

Published on

03921

कणकवलीत ‘भजन संध्या’ उत्साहात

कणकवली, ता. १२ ः प्रसिद्ध भजन गायक कृष्णा देशमुख, अजित गोसावी, संदीप देशमुख आणि प्रसिद्ध पखवाज वादक बंडुराज घाडगे यांच्या बहारदार जुगलबंदीतून कणकवलीत ‘भजन संध्या’ कार्यक्रम रंगला. तसेच उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगतदार होत गेला.
भजन प्रेमी ग्रुप कणकवली यांच्या वतीने शहरातील भालचंद्र आश्रम संस्थान येथे भजन संध्या हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी भालचंद्र बाबा संस्थानचे सचिव विजय केळुसकर, भजनी बुवा प्रकाश पारकर, भजनी कलाकार संस्थेचे सचिव गोपीनाथ लाड, भूषण वाडेकर, भास्कर गावडे, मारुती मेस्त्री, सुदर्शन फोपे, रविकांत मेस्त्री, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, संतोष राऊळ, डॉ.सुहास पावसकर, भजनी बुवा संदीप नाईकधुरे, बुवा सदानंद कसालकर, श्री.तळगावकर, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष श्री गवंडळकर, बाबा वरदेकर आदी उपस्थित होते.
‘भजन संध्या’ कार्यक्रमाला मयूर मेस्त्री, रोहन गावडे आणि सागर राठोड यांनी कार्यक्रमासाठी संगीत साथ दिली. गणेश जेठे यांनी प्रास्ताविक केले. संतोष कानडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन कलेचे संवर्धन करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहोत. त्याला जनतेने साथ द्यावी, असे आवाहन केले. प्रकाश पारकर यांनीही मनोगत व्यक्त केले. गोपीनाथ लाड यांनी सूत्रसंचालन केले. भूषण वाडेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com