रत्नागिरी ः राज्य नाट्य स्पर्धा

रत्नागिरी ः राज्य नाट्य स्पर्धा

Published on

राज्य नाट्य स्पर्धा---------लोगो

rat14p7.jpg-
04328
रत्नागिरी ः खल्वायन-रत्नागिरी या संस्थेच्या मंगलाक्षता या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
-----------
''मंगलाक्षता''मधून
स्त्री व्यक्तीरेखांचे उत्तम दर्शन
खल्वायनचे पुरुष पात्रविरहित नाटक ; रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ः आजच्या कौटुंबिक व सामाजिक व्यवस्था, विविध स्वभावांच्या व्यक्तीरेखा यावर भाष्य करणारे स्त्री व्यक्तीरेखांचे उत्तम दर्शन ''मंगलाक्षता'' या संहितेतून लेखक (कै.) श्रीराम विठ्ठल हर्षे यांनी घडवले आहे आहे. राज्य नाट्यस्पर्धेत खल्वायन-रत्नागिरी या संस्थेने सादरीकरण केले. पुरुष पात्रविरहित नाटक स्पर्धेत करण्याचे शिवधनुष्य ज्येष्ठ रंगकर्मी-दिग्दर्शक मनोहर जोशी यांनी उचलले आणि यशस्वी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या या नाटकाला रसिकांनी महिला कलाकारांच्या अभिनयाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. नेपथ्य, रंगभूषा, अभिनय अशा चहुबाजूने महिलांचे नाटक सर्वांगसुंदर झाले.
-------
काय आहे नाटक0

समाजातील झापडबंद विचारसरणी, साचेबंद पुरुषी अहंकार, चालीरिती यांचा पगडा आणि त्याला झिडकारणारी नवी उमेद यांचा उहापोह मंगलाक्षता या संहितेतून साकारण्यात आली आहे. या नाटकामधील सरला कुलकर्णी यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना दोन मुली आहेत. शोभना नोकरी करते तर मोहिनी कॉलेजमध्ये शिक्षण घेते. त्यातील शोभना ही दिसायला कुरूप असल्यामुळे तिचे लग्न जमत नाही. आईसह शेजारी रमा व तिचे पती हे शोभनाचा विवाह जमवण्याचा प्रयत्न करत असतात; मात्र यश येत नाही. एक दिवस शोभनाला पाहण्यासाठी मुलगा येणार असतो; पण त्या ठिकाणी मुलाची आई लक्ष्मीबाई येते. मुलगी बघण्याच्या कार्यक्रमावेळी सरलाकाकू, रमा आणि इकडचे-तिकडे करणारी खट्ट्याळ सीता या उपस्थित असतात. लक्ष्मीबाई शोभनाला आवडीनिवडी विचारतात तसेच मुलगा लग्नानंतर गावी राहणार, असे सांगतात. त्या वेळी शोभनाची बहीण मोहिनी लक्ष्मीबाईंना उलट उत्तर करते. तेव्हा लक्ष्मीबाई काहीही न बोलता तिथून निघून जातात. काही दिवसानंतर लक्ष्मीबाईकडून नकार कळवला जातो; पण नकार देताना शोभनाच्या कुरूपतेवर भाष्य केलेले असते. ते वाचल्यानंतर सुस्वभावी, सालस शोभना मनातून खचते. बत्तीस वर्षांपर्यंत तिच्या कुरूपतेमुळे अनेक मुले तिला विवाहासाठी नकार देत राहतात. त्यामधूनही ती स्वतःला सावरत असते. शोभना ज्या ठिकाणी नोकरी करत असते तेथे साने नावाच्या मुलावर शोभनाचे प्रेम जडते. हा सगळा प्रकार ती आईला सांगते; मात्र ही माहिती शोभनाच्या कॉलेजमधील मैत्रिणी चंचला आणि सीता यांना समजते. त्या वेळी चंचला म्हणते, ताई तू साने नावाच्या मुलाला ओळखत नाहीस. मोहिनीला व मला त्याने असेच पत्र पाठवले आहे. चंचला ते पत्र शोभनाच्या हाती देते तर सीता सांगते की, त्याचे लग्न झाले आहे. माझ्या नात्यातील मुलीशी घटस्फोट घेणार आहे. या सगळ्याचा परिणाम शोभनावर होतो. ते ऐकून पुन्हा ती खचते. याच कालावधीत शोभनाची बहीण मोहिनी हिला प्राध्यापकांबरोबर भांडण केले म्हणून, कॉलेजमधून काढून टाकले जाते. आई त्याचा जाब विचारते, त्या वेळी मोहिनी आईला सांगते, मी बाहेर जगायला समर्थ आहे. माझे अनेक मित्र आहेत. मी सिनेमात काम करणार, असे सांगून घरातून निघून जाते. तिला सिनेमातील भूलभुलैय्यात अनेक वाईट अनुभव येतात. काही कालावधीतच ती घरी परतते. त्याचवेळी शोभनाला मागणी टाकलेल्या लक्ष्मीबाईंच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका सरलाकाकूला येते. लग्नाच्या एक दिवस अगोदर लक्ष्मीबाईचा मुलगा ज्या मुलीशी लग्न करणार असतो तिचा मृत्यू होतो. पुन्हा आशा पल्लवित करून लक्ष्मीबाई शोभनाच्या घरी येतात. सरलाकाकूला विनवणी करतात जेणेकरून लग्न मोडू नये आणि शोभनाने लग्नाला होकार द्यावा; पण शोभना या सर्व गोष्टीला नकार देते. मी आजन्म अविवाहित राहीन असा पण करते; मात्र तिची आई व रमा काही तासांची मुदत घेतात. चंचला आपल्या विवाहाच्या मंगलाक्षता घेऊन घरी येते. त्या वेळी शोभना आपल्या कुरूपतेचे समाज किती हसे करतो, या विषयी बोलते. या गोष्टीचा तिला किती मानसिक त्रास होत असतो, हे दिसून येते. अशी ही मंगलाक्षताची कथा रंगवण्यात आली आहे. खल्वायन संस्थेने हे नाटक तेवढ्याच ताकदीने सादर केले आहे.
---------
सूत्रधार आणि सहाय्य

नेपथ्य ः प्रदीप तेंडुलकर, नेपथ्य सहाय्य ः मोहन धांगडे, किशोर नेवरेकर, सुधाकर घाणेकर, संजय लोगडे, सौरभ लोगडे, रामदास मोरे. रंगभूषा ः शमिका जोशी, प्राजक्ता जोशी. प्रकाशयोजना ः मंगेश लाकडे, अमित धांगडे. पार्श्वसंगीत ः प्राजक्ता जोशी. वेशभूषा ः राधा दाते. निर्मिती सूत्रधार ः श्रीनिवास जोशी.
----
* पात्र परिचय
मोहिनी ः सायली सोबळकर, चंचला ः नेत्रा केळकर. शोभना ः नेहा उकिडवे. सरला काकू ः रश्मी केळकर. रमा ः मानसी सोबळकर. सीता ः आदिती केळकर. लक्ष्मीबाई ः नेहा जोशी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com