कुडाळात २१ ला
दिव्यांग नोंदणी

कुडाळात २१ ला दिव्यांग नोंदणी

Published on

कुडाळात २१ ला
दिव्यांग नोंदणी
कुडाळ : केंद्र आणि राज्याच्या समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध निवृत्ती वेतन व अनुदान योजनांच्या लाभार्थ्यांना ‘युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड’ तयार करून घेणे अनिवार्य आहे. यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर २१ ला येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत दिव्यांग नोंदणी व वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केले आहे. शिबिरास येताना आधारकार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, ४ वर्षांपूर्वीचे अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास त्याची प्रत सोबत आणावे.
------------
आठवडा बाजार
मतदान दिनी बंद
सिंधुदुर्गनगरी ः नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत, मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ले पालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क निर्बाधपणे बजावता यावा, तसेच कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित ठिकाणचे आठवडा बाजार मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. या बाजारांना अन्य दिवशी भरविण्यास परवानगीही दिली आहे. यात सध्या उपलब्ध माहितीनुसार मतदान दिवशी सावंतवाडी, कणकवलीतील आठवडा बाजार बंद राहतील.
-----------
दिव्यांग तक्रार
निवारण बैठक
सिंधुदुर्गनगरी ः ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीची मासिक सभा १७ ला सकाळी दहाला होणार आहे. ही बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केली आहे. जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी आपल्या नजिकच्या पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून ऑनलाईन माध्यमातून सभेत सहभागी व्हावे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी आवाहन केले आहे.
---
त्रिंबकमध्ये आज
हरीनाम सप्ताह
आचरा ः त्रिंबक येथील महापूरुष मंदिरात उद्या (ता.१५) सात प्रहराचा अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. सकाळी १०वाजता यास प्रारंभ होईल. रविवारी (ता.१६) सप्ताहाची सांगता, दुपारी महाप्रसाद होईल. भाविकांनी या सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन श्री महापूरुष प्रा. भजन मंडळ त्रिंबक बगाडवाडीतर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com