सावंतवाडी रुग्णालयात सात डॉक्टर रुजू

सावंतवाडी रुग्णालयात सात डॉक्टर रुजू

Published on

04555


सावंतवाडी रुग्णालयात सात डॉक्टर रुजू

कंत्राटी पद्धतीने सेवेत; याचिका सुनावणीत दाखल प्रतिज्ञापत्रानुसार अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्गतर्फे दाखल जनहित याचिकेत शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रमाणे सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेत रुजू झाले आहेत. नवनियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अभिनव फाउंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, युवा रक्तदाता संघ या सामाजिक संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, अभिनव फाउंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, तुषार विचारे, राजू केळुसकर, किशोर चिटणीस, अमित अरवारी, विनोद वालावलकर, युवा रक्तदाता संघाचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. पी. डी. वजराटकर, डॉ. चौगुले, रुग्णालयाचे समुपदेशक सुनील सोन्सूरकर आदी उपस्थित होते. जितेंद्र मोरजकर, रवी जाधव, देव्या सूर्याजी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. ऐवळे यांनी, अभिनव फाउंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, युवा रक्तदाता संघ यांचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थांचे नेहमी सहकार्य असते. त्याबद्दल आभारी आहोत, असे सांगितले. श्री. सोन्सूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
---
नवनियुक्त डॉक्टरांचे संघटनांतर्फे स्वागत
‘सावंतवाडीकर जनता प्रेमळ आहे. मनापासून सेवा देणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पाठीशी ही जनता नक्की राहते. नवनियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना इथे कसलाही त्रास होणार नाही. काही गैरसोय वाटली तर त्यांनी हक्काने हाक द्यावी. सावंतवाडीतील सर्व संस्था, संघटना आणि नागरिक आपल्या पाठीशी नक्की राहतील,’ असा विश्वास तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. डॉ. बाळासाहेब नाईक, डॉ. अलफान आवटे, डॉ. ओंकार कोल्हे, डॉ. विघ्नेश चाकोरे, डॉ. गोपाळ गोटे, डॉ. प्रिया वाडकर, डॉ. क्रांती जाधव, डॉ. श्लोक हिरेमठ, डॉ. टी. कगनुलकर या नवनियुक्त अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. रुग्णांना चांगली सेवा देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com