देवगडात आज ''संविधान दिन''

देवगडात आज ''संविधान दिन''

Published on

देवगडात आज
''संविधान दिन''
देवगड, ता. २५ : येथील ''मिळून सारे'' या समुहाच्या वतीने उद्या (ता. २६) सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात संविधान दिन व महात्मा फुले पुण्यतिथी अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अंकुश कदम (माध्यमिक शिक्षक कुडाळ) मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
....................
कणकवलीत रविवारी
जिल्हा चित्रकला स्पर्धा
कणकवली, ता. २५ ः अप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली यांच्यावतीने रविवारी (ता. ३०) सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीही चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर यांनी केले आहे. स्पर्धा दोन गटात होणार आहे. पाचवी ते सातवी गटासाठी ''आवडता सण'' आणि ''वृक्षारोपण'' असे विषय आहेत, तर आठवी ते दहावी गटासाठी ''थंडीचे दिवस'' आणि ''जत्रा'' असे विषय आहेत. यापैकी एका विषयावर चित्र काढावयाचे आहे. स्पर्धेसाठी चित्र काढण्याचा पेपर ट्रस्टतर्फे पुरविण्यात येणार आहे. रंग साहित्य (रंगपेटी, ब्रश, पेन्सिल, क्रेयॉन्स) विद्यार्थ्यांनी स्वतः सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
......................
रेडी सिध्देश्वराचा
आज जत्रोत्सव
सावंतवाडी, ता. २५ ः रेडी-सुकळभाटवाडी येथील देव सिद्धेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. २६) साजरा होणार आहे. या निमित्ताने मंदिरात सकाळी धार्मिक विधी, नारळ, केळी ठेवणे, रात्री १२ वाजता ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणूक, नंतर दशावतारी नाटक होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
........................
वेंगुर्लेत १४ डिसेंबरला
तालुका वाचक स्पर्धा
वेंगुर्ले, ता. २५ ः सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व वेंगुर्ले नगरवाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने १४ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता येथील नगरवाचनालय संस्थेच्या लक्ष्मीबाई कोरगावकर सभागृहात तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे. वाचक स्पर्धेसाठी ''गंगाराम गवाणकर यांची कोणतीही साहित्यकृती'' यावर १० मिनिटांमध्ये परीक्षण सादर करावयाचे आहे. स्पर्धक वेंगुर्ले तालुक्यातील कोणत्याही वाचनालयाचा सभासद असावा. वेंगुर्ले शहराबाहेरून येणार्‍या स्पर्धकाला येण्याजाण्याचा १०० रुपये प्रवास खर्च देण्यात येईल. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००, २५०, १५० रुपये अशी पारितोषिके देण्यात येतील. इच्छुक स्पर्धकांनी वाचनालयाच्या माध्यमातून १० डिसेंबरपर्यंत वेंगुर्ले नगरवाचनालय येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com