निवडणूक विकासाचे व्हिजन घेवून ताकदीने लढवणार
देवरूखच्या विकासासाठी मनसे मैदानात
जितेंद्र चव्हाण ः पाच अपक्ष उमेदवार निवडणुकीत
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २५ ः विकासाचे व्हिजन घेऊनच मनसेने देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार उतरवले आहेत, असे मनसेचे नेते जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
देवरूख येथे मनसेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, देवरूख हे तालुक्याचे ठिकाण आहे; मात्र तरीही शहरात सार्वजनिक शौचालय नाही, ही दुर्दैवी बाब आहे. नगरपंचायत इमारतीचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. वीजवाहिन्यांचे जाळे व वाहतूक कोंडी या समस्या सतत भेडसावत आहेत. त्यामुळे मनसेने या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचे ठरवले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला; मात्र जिथे मनसेची ताकद असेल तिथे निवडणूक लढण्यास त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यानुसार देवरूखमध्ये मनसेची ताकद असल्यामुळे आम्ही ही निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी आमचे नगरसेवक येणे गरजेचे आहे. त्यामुळे ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवत आहोत.
या प्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, देवरूख शहराध्यक्ष सागर संसारे, उपशहराध्यक्ष अक्षय झेपले, शहर सचिव तुषार बांडागळे, मनविसेचे शहराध्यक्ष ऋतुराज देवरूखकर, कार्यालय प्रमुख विलास खोचाडे, शाखाध्यक्ष ओंकार विंचू, सरताज कापडी, सलमान बोदले, परेश धामनाक आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

