खेड जेसीजला १२ पुरस्कार
खेड जेसीजला
१२ पुरस्कार
खेड ः विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गोवा येथे आयोजित विभागीय परिषदेत खेड येथील जेसीज संस्थेला १२ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. संघभावना, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सदस्यांचे मोलाचे योगदान यामुळेच ही प्रतिष्ठेची कामगिरी साध्य झाली असल्याचे अध्यक्ष अमर दळवी यांनी सांगितले. अध्यक्ष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी जनहितकारक उपक्रम राबवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले. या उल्लेखनीय कार्याबद्दल अमर दळवींना सर्वोत्कृष्ट जेसी अध्यक्ष, कपिल कोळेकरना उत्कृष्ट सचिव, हेमंत चिखलेने उत्कृष्ट एलओ ऑफिसर, मधूर पेठेंना उत्कृष्ट जेसी मेंबर ऑफ झोन, डॉ. दिग्विजय पवार यांना उत्कृष्ट न्यू जेसी मेंबर यासह एकूण १२ पुरस्कार मिळाले आहेत. हे पुरस्कार जेसीजचे विभागीय अध्यक्ष शाबा गावस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जेसीजचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रितेश शर्मा, झोन ११चे माजी अध्यक्ष अतुल गोंदकर, ईशान उसापकर, सचिन कुर्तीकर, सचिन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
आंबये येथे
दत्तजयंती उत्सव
खेड ः तालुक्यातील श्री दत्तगुरू देवस्थान, दत्तवाडी आंबये ग्रामस्थ तसेच पुणे, ठाणे, मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा श्री दत्तजयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. ४ डिसेंबर रोजी दत्तजयंती असून, या निमित्त मंदिर परिसरात विविध उपक्रम आयोजित केले आहेत. ४ ला सायंकाळी दीपप्रज्वलनानंतर पूजा, अभिषेक व होमहवन कार्यक्रम होणार आहेत. याच दिवशी गावातील व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सत्संग व संस्कारवर्गाचे आयोजन केले आहे. रात्री हरिपाठ, भजन व महाप्रसाद आहे. ५ ला धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. शुक्रवारी सकाळी काकडआरती व दीपपूजनाने कार्यक्रमांचा प्रारंभ होईल. दुपारी भक्तजनांसाठी महाप्रसाद आहे. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, दत्तगुरूंच्या पालखी प्रदक्षिणा आणि भक्तीगीते मंडळाच्यावतीने सादर करण्यात येणार आहेत. भक्तांनी उपस्थित राहून दत्तजयंतीचा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन संस्थेचे प्रणित सकपाळ यांनी केले आहे.
आंबडसमध्ये ६ पासून
कीर्तन महोत्सव
खेड ः तालुक्यातील आंबडस येथील श्री गुरूमाऊली सामाजिक सेवा संस्था अंतर्गत वारकरी शिक्षणसंस्थेच्यावतीने ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत जनकल्याण कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. ६ रोजी आंबडस येथील दिनेश करंजकर यांचे प्रवचन, मुंबईतील अर्जुन सुंभे यांचे कीर्तन व आंबडस येथील महिला भजन मंडळाचा जागर होईल. ७ ला चिरणी येथील जनार्दन आंब्रे यांचे प्रवचन, मुंबईतील ज्ञानेश्वर सांगले यांचे कीर्तन व शेल्डी येथील स्वर विठाई भजन मंडळाचा जागर होईल. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बदललेल्या जीवनशैलीतून आलेल्या आजारांबद्दल मार्गदर्शन व जनजागृती केली जाईल. करण भानत, प्रणित खांडेकर, आदित्य पडवेकर मार्गदर्शन करतील. ८ ला सकाळी १० ते १२ या वेळेत मुंबई येथील तुकाराम निकम यांचे काल्याचे कीर्तन होईल. हरिपाठ व कीर्तनासाठी गुरुमाऊली वारकरी शिक्षणसंस्था विद्यार्थी, सांप्रदाय मंडळ, गजमल पिंपळी, महिला व वारकरी मंडळ-आंबडस, युवा पंचक्रोशी वारकरी मंडळ, रत्नागिरी युवा वारकरी सांप्रदाय मंडल सहभाग नोंदवणार आहेत. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष राकेश मोरे यांच्यासह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

