अनाथ प्रमाणपत्रांचे सिंधुदुर्गनगरीत वाटप
अनाथ प्रमाणपत्रांचे
सिंधुदुर्गनगरीत वाटप
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ ः महिला व बाल विकास विभागामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ५ लाभार्थींना अनाथ प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी दिली. ज्या बालकाचे वय १८ वर्षांच्या आत असताना आई व वडील दोघेही मृत झाल्यास अशा बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे नोकरी व शिक्षणासाठी एक टक्का आरक्षण मिळण्यास मदत होते. अशा अनाथ मुलांना राज्याच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा, याकरिता महिला व बालविकास विभागामार्फत संस्थात्मक व संस्थाबाह्य प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आज अखेर ६१ अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, संरक्षण अधिकारी मिलन कांबळे तसेच कर्मचारी उपस्थित होते.
--
Regards :
District Information Office,
Sindhudurg.
diosindhudurg@gmail.com
02362-228859
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

