कणकवली रेल्‍वे स्थानकात 
प्रौढाचा मृतदेह आढळला

कणकवली रेल्‍वे स्थानकात प्रौढाचा मृतदेह आढळला

Published on

कणकवली रेल्‍वे स्थानकात
प्रौढाचा मृतदेह आढळला

कणकवली, ता. २६ : येथील रेल्‍वे स्थानकातील दोन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री १.१० च्या सुमारास एका प्रौढाचा मृतदेह आढळला. त्‍याच्या खिशात सापडलेली चिठ्ठी आणि आधारकार्ड यावरून हा मृतदेह अनिल गिरीधर पवार (रा. कनकनगर, मूळ रा. श्रावण, ता. मालवण) याचा असल्‍याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कणकवली रेल्‍वेस्‍थानकातून मुंबईच्या दिशेने मालगाडी रवाना होत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या ट्रॅकवर एका व्यक्‍तीला मालगाडीच्या इंजिनाची धडक बसली. याबाबतची माहिती लोको पायलटने तातडीने कणकवली रेल्‍वे स्टेशन मास्तरांना दिली. त्‍यांनी ही माहिती कणकवली पोलिस ठाण्याला कळवली. त्‍यानंतर कणकवली पोलिस हृदयनाथ शिंदे यांच्यासह अन्य पोलिसांनी रेल्‍वे स्थानकात धाव घेतली. त्‍यावेळी प्लॅटफॉर्म दोनवर एका प्रौढाचा मृतदेह आढळला. त्‍याच्या डोक्‍याला जोरदार मार बसल्‍याने त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला होता. त्‍याच्या शर्ट आणि पॅन्टची तपासणी पोलिसांनी केली. त्‍यावेळी शर्टच्या खिशामध्ये एक कागद आढळला. त्‍यात ‘तुमचा वडील स्वत: लिहून ठेवतो की, माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले, तरी तुमचा कोणाचा दोष नाही आणि माझा शोध कुणीही घेऊ नये. आ.बाबा अनिल’ असा मजकूर होता. तसेच खिशामध्ये आधार कार्ड आढळले. त्‍यावर अनिल गिरीधर यादव, असे नाव आढळून आले. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यू अशी नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com