चिपळूण ः वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात

चिपळूण ः वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात

Published on

rat26p8.jpg-
06725
चिपळूणः रिगलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत रंगलेल्या कबड्डी स्पर्धा.

रिगल सीबीएसई स्कूलच्या
वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ः तालुक्यातील कोंढे येथील रिगल सीबीएसई स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. दोन दिवसीय स्पर्धेत पूर्व प्राथमिक ते माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय धावपटू संदीप जोयशी व राष्ट्रीय कबड्डीपटू विवेक जांभळे यांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. क्रीडा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची गुरूकिल्ली आहे. खेळांमधून शारीरिक तंदुरूस्ती, मानसिक संतुलन आणि नेतृत्वगुण विकसित होतात. यासाठीच आपण दररोज किमान दोन तास खेळासाठी वेळ दिला पाहिजे, असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले.
क्रीडा विभागाने यावर्षी खेळांचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढवून विविध स्पर्धांचे आयोजन केले. त्यात सांघिक मैदानी क्रीडाप्रकारांमध्ये माध्यमिक विभागासाठी कबड्डी, खो-खो, क्रिकेट, लंगडी या क्रीडाप्रकारांचा तसेच वैयक्तीक क्रीडाप्रकारात १००, ४०० मीटर धावणे, रिले, गोळाफेक, बॅडमिंटन याचबरोबर इनडोअर खेळांमध्ये कॅरम, बु‌द्धिबळ या क्रीडाप्रकारांचा तसेच पूर्व प्राथमिक विभागाकरिता चमचा लिंबू, संगीत खुर्ची, बुक बॅलन्स या क्रीडाप्रकारांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com