माजी विद्यार्थी रमले शालेय आठवणींत

माजी विद्यार्थी रमले शालेय आठवणींत

Published on

06811
माजी विद्यार्थी रमले शालेय आठवणींत
सोलापूरमध्ये स्नेहमेळावा ः शिरगाव हायस्कूलच्या सवंगड्यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ : तालुक्यातील शिरगाव हायस्कूलच्या दहावीच्या १९८४-८५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा द्वितीय स्नेहमेळावा सोलापूर येथे उत्साहात झाला. दोन दिवस हा मेळावा होता. यावेळी उपस्थितांनी आठवणींना उजाळा दिला. सन्मानचिन्ह देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले.
शिरगाव हायस्कूलच्या दहावीच्या १९८४-८५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची सुमारे ३० वर्षांनी एकत्र भेट होऊन गतवर्षी शिरगाव हायस्कूलमध्ये सर्व माजी विद्यार्थी आणि तत्कालीन शिक्षकांसह स्नेहमेळावा घेण्यात आला होता. त्यावेळी शाळेला भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी दरवर्षी असा स्नेहमेळावा विविध ठिकाणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार यंदा हा मेळावा सोलापूर येथे दोन दिवसांसाठी निवासी घेण्यात आला. यावेळी आठवणी जागवण्यात आल्या. विविध विषयांवर चर्चा झाली. शालेय जीवनातील आठवणी जागवण्यात आल्या. यामध्ये सीमा पोकळे-कोदे, विष्णू परब, रघुनाथ उर्फ महेश पवार, पांडुरंग सावंत, सत्यवान चौकेकर, शरयू साटम-आयरे, सत्यविजय राणे, विजया फाटक-लोके, संजय सावंत, तुकाराम सावंत, अश्विनी सावंत, सुधीर साळसकर, लता चव्हाण-अदम, दिनकर तथा आण्णा मिराशी, विजय घाडी आणि संतोष कुळकर्णी आदी सहभागी झाले होते.
यावेळी अंजू महेंद्रकर कुटुंबियांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवनातील तत्कालीन गमतीजमती सांगण्यात आल्या. सन्मानचिन्ह देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले. सौ. साटम यांनी सूत्रसंचालन केले. श्री. कुळकर्णी यांनी आभार मानले. दरम्यान, या स्नेहमेळाव्यानिमित अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर अशा श्री क्षेत्री भेटी देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com